आदर्श पतसंस्थेच्या व्यवसायामध्ये रु. 134 कोटींची वाढ

आदर्श पतसंस्थेच्या व्यवसायामध्ये रु. 134 कोटींची वाढ

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- जनमाणसात पतसंस्थाबाबत अविश्वासाचे वातावरण असताना आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेवर मात्र ग्राहकांचा विश्वास वाढतच आहे. 2024 – 2025 या आर्थिक वर्षात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकत्रित व्यवसायात रु. 134 कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. आदर्शचा एकत्रित व्यवसाय 752 कोटी 77 लाख रूपयांचा झाला आहे. आदर्शला 7 कोटी 51 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
2024 – 2025 या आर्थिक वर्षात आदर्श पतसंस्थेने 752 कोटी 77 लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. 2023 – 2024 या आर्थिक वर्षापेक्षा 134 कोटी रूपयांनी एकत्रित व्यवसाय वाढला आहे. आदर्शचे वसूल भागभांडवल 18 कोटी 46 लाख रूपये आहे. आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवी रु. 434 कोटी 66 लाख रूपये आहे. रु. 318 कोटी 11 लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रु. 100 कोटी 12 लाख रूपये सोनेतारण व मुदतठेव तारण कर्ज वाटप करण्यात आले. आदर्शचा स्वनिधी रु. 47 कोटी 83 लाख रूपये आहे. वसूल भागभांडवल रु. 18 कोटी 46 लाख रूपये आहे. रु. 151 कोटी 32 लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. कर्ज व ठेवीचे प्रमाण (सी डी रेश्यो) 66.35 टक्के आहे. ढोबळ नफा रु.10 कोटी 50 लाख रूपये असून निव्वळ नफा रु.7 कोटी 51 लाख रूपये आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकूण 19 शाखा आहेत. या सर्व शाखा नफ्यात आहेत. सर्व शाखांंच्या व्यवसायात वाढ झाली आहे.
सर्व शाखांमधील कर्मचार्‍यांनी प्रामणिकपणे काम केले. चांगली कर्ज वसूली केली . कर्जदारांनी देखील चांगले सहकार्य केले. बदलत्या परिस्थितीत देखील कर्जदारांनी संस्थेला सहकार्य करून दर महिन्याला हप्ते भरले त्यामुळे ढोबळ एनपीए 01 टक्क्यापेक्षा कमी राखता आला, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत त्यापैकी रायगड जिल्ह्याबाहेरील पहिली शाखा वारजे – पुणे येथे सुरू झाली आहे व दुसरी शाखा खोपोली येथे सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025