दीपक वाघ: सटाणा तालुक्यातील करंजाड येथे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने येथील ग्रामदैवत दुर्गा माता यात्रेला मोठ्या उत्सवात सुरूवात झाली.दर वर्षा प्रमाने सकाळी देवीचा मानाचा रथ निघतो. सकाळी रथाला सजवून गावातून देवीच्या मानाच्या रथाची मिरणुक काढून दुपारून आयोजकांकडून यात्रेला जंगी सुरुवात केली जाते .या मानाच्या रथाच्या मिरवणुकीत परिसरातील सर्व भाविक भक्त एकत्र येवून रथाची मिरवणूक काढतात.देवीला भाविक भक्तांकडून नवस फेडले जातात पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.तसेच नवसाला पावणारी ही देवी साक्षात्कार सुद्धा देते अशी भाविकांची भावना आहे.
तालुक्याच्या परिसरातील व्यापारी आपापली दुकाने लगबगीने घेऊन येता आणि इथे आपली दुकान सजवली जातात. या यात्रेमुळे पंचक्रोशीतील भाविकांची गर्दीमुळे भक्तिमय वातावरण तयार होऊन जाते. आणि पुढील माताची धार्मिक विधी केली जाते.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी महादेव मंदिरा जवळ यात्रे निमित्त कुस्थ्यांची दंगल रंगवली जाते आणि सायंकाळी मनोरंजनासाठी लोककला (तमाशा) सुद्धा प्रदर्शित केली जाते.









