वर्धा जिल्हात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पाच केंद्र तयार.

वर्धा जिल्हात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पाच केंद्र तयार.

वर्धा जिल्हात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणासाठी पाच केंद्र तयार.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा,दि.3 मे:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस रुग्णांची रोज भर पडत आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम पण प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. रविवारी वर्धा जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून लसीकरणाला सुरूवात झाली असून, या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच कोविड19 व्हॅक्सिन दिली जात आहे. या पाचही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी एक हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत.

45 पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. 18 ते 44 वयोगटातील प्रत्येक लाभार्थ्याला राज्य सरकार नि:शुल्क लस देणार असून, केंद्राकडून खरेदी केलेल्या 3 लाख लसीच्या डोजपैकी 5 हजार डोज वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. हीच व्हॅक्सिन 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवत जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून रविवारी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

या पाचही केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या लाभार्थ्याला कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे तरी याची सर्व लोकांनी नोंद घ्यावी अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here