जळगावात जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या परीवारावर जीवघेणा हल्ला.
जळगावात जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या परीवारावर जीवघेणा हल्ला.

जळगावात जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या परीवारावर जीवघेणा हल्ला.
अत्यंत हिनतेचे वागणुक, घरची नासधूस, बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड आणि विटंबना केल्याप्रकरणी जातीवादी हल्लेखोरावर अट्रासिटी अक्ट कायदानुसार गुन्हा दाखल व्हावा. पिढीत परीवाराची मागणी.

जळगावात जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या परीवारावर जीवघेणा हल्ला.
जळगावात जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या परीवारावर जीवघेणा हल्ला.

जळगाव/मुंबई,1मे:- जळगाव मधिल सिटी पोलीस स्टेशन अन्तर्गत येणा-या विकास दुध फेडरेशन जळव राजमालती नगर येथिक राहणा-या एका बौद्ध समाजाच्या परीवारावर 20 ते 25 जातीवादी लोकांनी संगममत करुन क्रिकेट बैट, चापर, हाक्की टिक, टम्प यांनी जीवघेना हल्ला करण्यात आला आहे. यात बौद्ध समाजातील 5 ते 7 लोकांना गंभीर स्वरुपाचा मार लागला आहे.

प्राप्त माहिती नुसार राजमालती नगर येथे राहणारे मिडिया वार्ता न्यूज़चे जळगाव जिल्हा प्रतिनिधि विशाल सुरवाडे हे आपल्या घरा समोर सकाळी 10च्या सुमारास क्रिकेट खेळत होते. त्यावेळी जातीवादी संजु पटेल यांच्या मुलगा जानु पटेल त्याठीकाणी आला आणि जोर जोरात ओरडत अशिल शिवीगाळ सुरू केली. विशाल सुरवडे यांनी त्याला का बर शिवीगाळ करत गोंधळ करत आहे अस विचारल तर तो जीवानिशी ठार मारण्याची धमकी देत परत शिवीगाळ सुरू केली.

जानु पटेल ने मग आपल्या गुंड प्रवृतीच्या जातीवादी लोकांना फोन केला आणि घटनास्थळी बोलावून घेतल. जवळ पास 20 ते 25 लोक हे मिळुन बौद्ध समाजाचा सुरवाडे परीवारावर जीवघेना हल्ला केला. ते सर्व जातीवादी विशाल सुरवाडे यांच्या घरात घुसले, घरात असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या मुर्त्या फ़ेकण्यात आल्या. सुरवाडे परीवारातील अजित सुरवाडे, प्रेम सुरवाडे, छाया मानीक वानखेडे यांना मोठ्या प्रमाणात मारहान करण्यात आली. त्यात सुरवाडे परीवारातील महिला या लोकांना समजवयाला गेले असता या जातीवादी गुंडानी या महिलांना मारहान करत जातीवाचक शिवा दिला, यात मोठ्या प्रमाणात महिलांना पण मारलेचे समोर आले आहे. त्यात संजु सुरवाडे याला चापर या हत्यारानी वार करुन गंभीर जखमी केल. त्यानंतर या जातीवादी गुंडानी त्यांचा घराचा काचा, दुचाकी गाडी, चारचाकी गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.

जातीवादी संजु पटेल, जानु पटेल, जावेश पटेल, आवेश पटेल, जिशान पटेल, समीर, कालु रिक्षेवाला आबिद पटेल बरोबर 20 ते 25 जातीवादी हत्यार घेऊन जातीवाचक शीवागाळ करत होते, त्यावेळी विशाल सुरवाडे यांच्या आत्याचा मुलगा रविंद्र जनजाळे रत्यावरून जात होता त्याला पण मारण्यात आल. आणि जीवनाशी ठार मारण्याची धमकी दिली. आज बौद्ध समजाचा एक परीवारावर काही जातीवादी लोकांनी हल्ला केला. आज तो सुरवाडे परीवार भयभीत हौऊन भयाखाली आहे.

सुरवाडे परीवारानी दिलेल्या माहिती नुसार पोलीस जातीवादी गुंडावर कारवाई करण्यापेक्षा सुरवाडे परीवारावरच कारवाई करत आहे. आम्हचा परीवारावर जळगाव सिटी पोलिसांनी विविध कलमा नोंद करुन आम्हाला जेलात टाकण्यात आले. आम्हाला आता या जळगाव सिटी पोलिस अधिकाराकडून न्याय मिळेल अस दिसत नाही. त्यामूळे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here