श्रीवर्धन मध्ये घडले हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन
रशाद करदमे
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
मो. न. 9075333540
श्रीवर्धन: खरोखरच सांगण्यास अभिमान वाटणारी गोष्ट अशी की, ईंद हा मुस्लीम समाजातील मोठा सण असल्याने एक अपंग असलेला मुस्लीम बांधव नमाज पडण्यासाठी जात असतांना, नव्यानेच हजर झालेले PI श्री. संजय पाटील साहेब यांनी स्वत: सायकलवरुन युवकास मज्जीत मध्ये सोडले.
हे दृश्य पहाता आपल्याला अशी जाणीव होते की अजूनही आपल्या समाजात माणुसकी शिल्लक आहे शब्दात कौतुक होणार नाही इतके चांगले काम ह्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे
अंगावर जरी खाकीवर्दी असली तरी पोलिस कर्मचाऱ्यांनी कसलाही विचार न करता त्या मुलास हात पुढे केला माणुसकी हाच खरा धर्म आहे. मग ती दाखवताना काही विचार केला जात नाही या दृश्यातून स्पष्ट होतं.