माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे अशोकदादा साबळे विदयालयाचे उपमुख्याध्यापक चंद्रकांत जानराव सर सेवानिवृत्त…
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय येथे चंद्रकांत जानराव सर गेली ३० वर्ष कार्यरत होते जानराव सर हे १९ डिसेंबर १९९४ साली माणगांव मध्ये दाखल झाले प्रथम त्यांनी ३ वर्ष माणगांव येथील इतर शाळेत काढले त्या नंतर साबळे विद्यालय येथे रुजू झाले त्यांनी आतापर्यंत आपल्या शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य आपले योगदान दिले असून त्याची आज आपल्या शिक्षण क्षेत्रातील ३३ वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्वीत वयोमनानुसार तृप्त मनाने सेवानिवृत्त झालं आहेत.
माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालयचे मुख्याध्यापक डी एम जाधव सर, बोबडे सर, म्हस्के सर, आबावले सर, राजेंद्र सुर्वे सर, साबळे विद्यालयतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे अध्यक्ष राजीवजी साबळे माणगांव नगरपंचायत नगरसेविका शर्मिला सुर्वे,प्रशांत शेंडगे व महाड माणगांव पोलादपूर चे आमदार भरतशेठ गोगावले याच्या उपस्थितीमध्ये जानराव सर याचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत जानराव सर यांनी यांनी आपल्या 33 वर्षातील शिक्षणातील गोडी विद्यार्थीमध्ये केली होती विद्यार्थी हा आपला मित्र असून त्याच पुढील शिक्षण योग्य रीतीने होणे त्याच्यावर आलेलं संकट त्याची आर्थिक परिस्थिती पाहुण जानराव सर प्रत्येक विद्याथ्याला मदत करीत असत त्यांनी आजपर्यंत माणगांवकराचे मन जिंकली आहेत अशा थोर व्यक्तीला माणगांवकरानी तसेच शिक्षक विद्यार्थी यांनी मनापासून अभिवादन केले आहे.