१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त गेशिकाई फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने गौरव खेळाडूंचा सत्कार सोहळा २०२२-२३ संपन्न

सचिन पवार /विवेक काटोलकर 

मीडिया वार्ता न्यूज

मो:8080092301

माणगांव :-गेशिकाई फेडरेशन ऑफ इंडिया सलग्न रिक्यू यांच्या विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त माणगांव येथील अशोकदादा साबळे विदयालय येथे लोकनेते दादासाहेब साबळे,पद्मश्री दादा इदाते अध्यक्ष गेशिंकाय फेडरेशन इंडिया, जपान चे मुख्य प्रशिक्षक कास्तू तोशी सुहीरो, कार्याध्यक्ष संजय महाजन मुख्य प्रशिक्षक इंडिया व शिहान संजय गमरे यांच्या मार्गदर्शनखाली गौरव खेळाडूंचा कौतुक सोहळा उत्सहात पार पाडला

यावेळी या कार्यक्रमात मा.अँड. राजीवजी साबळे अध्यक्ष माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळ, मा. कु. अभिनंदन तानाजी दळवी आंतरराष्टीय खेळाडू जळतरण यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न झाला.

खेळाडूंच्या कौतुक सोहळ्यासाठी माणगांव तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती विविध क्षेत्रात आपली कलागुण दाखवून पालकांची मने जिंकली या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेश व सरस्वती मातेच्या मूर्तीला हार घालून सुरुवात केली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहूने अशोकदादा साबळे विद्यालचे मुख्याध्यापक डी एम जाधव सर, माणगांव तालुक्याचे उद्योजक विरेश येरुणकर, माणगांव नगरपंचायतच्या नगरसेविका शर्मिला सुर्वे मॅडम,युनांटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका झोया बडे मॅडम, शिपूरकर इंग्लिश मेडीयमच्या मुख्याध्यपिका मनीषा मोरे मॅडम,युवा नेते चिन्मय मोने, उद्योजक अनिल पवार, उद्योजक सिद्धार्थ मोरे, उद्योजक ज्ञानेश्वर उतेकर याच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पाडला. गेशिकाई फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव खेळाडूंचा सत्कार सोहळा २०२२-२३ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here