नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी :जिल्हाधिकारी संदीप कदम* *मान्सून पूर्वतयारी आढावा* *कंट्रोल रुम सक्रीय ठेवा* *नाले सफाई तात्काळ करा* *नदीकाठच्या गावांना भेटी द्या*
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी :जिल्हाधिकारी संदीप कदम* *मान्सून पूर्वतयारी आढावा* *कंट्रोल रुम सक्रीय ठेवा* *नाले सफाई तात्काळ करा* *नदीकाठच्या गावांना भेटी द्या*

*नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी :जिल्हाधिकारी संदीप कदम*

*मान्सून पूर्वतयारी आढावा*

*कंट्रोल रुम सक्रीय ठेवा*

*नाले सफाई तात्काळ करा*

*नदीकाठच्या गावांना भेटी द्या*

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी :जिल्हाधिकारी संदीप कदम* *मान्सून पूर्वतयारी आढावा* *कंट्रोल रुम सक्रीय ठेवा* *नाले सफाई तात्काळ करा* *नदीकाठच्या गावांना भेटी द्या*
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी :जिल्हाधिकारी संदीप कदम*
*मान्सून पूर्वतयारी आढावा*
*कंट्रोल रुम सक्रीय ठेवा*
*नाले सफाई तात्काळ करा*
*नदीकाठच्या गावांना भेटी द्या*

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961

भंडारा, दि.3: यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून मागील वर्षीची अतिवृष्टी व पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले. जिल्हापरिषद सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पिण्याचे शुध्द पाणी, तात्पुरती निवास व्यवस्था सुस्थितीत असावी, जेवणाची व्यवस्था आदी बाबत नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावात ही व्यवस्था कोण करणार आहे याची खात्री करुन घ्यावी. दर निश्चित करण्यात यावे. जरनेटर उपलब्ध करून दिला जावा. वीज गेल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागतो. औषधसाठा ठेवावा, मॉक ड्रील घ्याव्यात. धोक्याचे फलक लावण्यात यावेत ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. रस्ते पुल तपासणी करुन घ्यावी. तसे फलक लावावे जुन्या पुलांची तपासणी करावी. धोकादायक असल्यास फलक लावावा. नाल्यांची सफाई करावी. संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात यावेत. बाधित गावात कुठल्या कंपनींचे नेटवर्क प्रभावी कार्य करते याची माहिती ठेवावी व शक्य असल्यास त्या कंपनीचे मोबाईल असलेल्यांची माहिती एस.ओ.पी मध्ये असावी. अशा सुचना त्यांनी दिल्या.
प्रत्येक तालुक्यात हेलीपॅडची व्यवस्था करावी. जागेचे अक्षांश रेखांश कळवावे. स्थानिक नावाडी व पोहणाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यात यावी. त्यांना मानधन देण्यात येईल. पब्लीक अनाउंसमेंट सिस्टम अद्ययावत ठेवण्यात यावी. पुरबाधित घरे व नदीच्या काठावरील घरे तसेच नादुरुस्त घरे व पडझड झालेल्या घरांना नोटीस देण्यात यावी. त्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे. ही कामे प्राधान्याने केल्यास येणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करतांना अडचणी निर्माण होणार नाहीत. एसडीआरएफ मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाधित गावांशी संबंधित ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना रेस्कू ऑपरेशन कसे करायचे याबाबत हे प्रशिक्षण असणार आहे.
सर्व तालुक्यात कंट्रोल रुम कार्यान्वित करावी. तहसीलदार यांनी ती अद्ययावत आहे किंवा नाही याबाबत नियमीतपणे माहिती घ्यावी. एक चेकलिस्ट ठेवावी. त्यानुसार काम होते किंवा नाही याचा सुध्दा आढावा घ्यावा. त्यांना प्रशिक्षण द्यावे. कंट्रोल रुम ॲक्शन मोडमध्ये ठेवावी. कंट्रोल रुमचा नंबर प्रसिध्द करावा व प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये लावावा. या काळात शाळेची एक चावी ग्रामसेवकांनी आपल्याकडे ठेवावी. शाळेची स्वच्छता करुन घ्यावी. असेही त्यांनी सांगितले.
नदीकाठावरील तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी करावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी करावी. तसेच त्या ठिकाणी प्राथमिक सुविधा पावसाळ्यापुर्वीच उपलब्ध करुन द्यावीत. पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या रस्त्याची माहिती असणारे रेडियमचे फलक लावण्यात यावेत. संजय सरोवर नियंत्रण कक्षाशी नियमित संपर्क ठेवावा.
भंडारा कंट्रोल रुमचा 1077 हा क्रमांक व 07184-251222 हा क्रमांक 24×7 कार्यान्वित असणार आहे. आपत्ती निवारणासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा व त्याचा संपर्क क्रमांक कंट्रोल रुमला देण्यात यावा. गावातील सरपंच, मुख्याध्यापक यांचीही संपर्क यादी अद्ययावत करावी. आरोग्य विभागाने औषधसाठा पुरेसा उपलब्ध ठेवावा. नाली खोलीकरण व स्वच्छता प्राधान्याने करावी. ही सगळी कामे मिशन मोडवर तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here