पुर्व विदर्भात बुरशीच्या आजाराचा तांडव; आता पर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु.
पुर्व विदर्भात बुरशीच्या आजाराचा तांडव; आता पर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु.

पुर्व विदर्भात बुरशीच्या आजाराचा तांडव; आता पर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु.

म्यूकर माइकोसिस नागपुर जिल्हात सर्वाधीक मृत्यु.

पुर्व विदर्भात बुरशीच्या आजाराचा तांडव; आता पर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु.
पुर्व विदर्भात बुरशीच्या आजाराचा तांडव; आता पर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.3 जुन:- कोरोना वायरस महामारीच्या संसर्गाने मागील अनेक महिन्यांपासून थैमान घातले आहे. या जीवघेण्या कोरोना वायरस मधून सुटका झालेल्यांना आता म्यूकर माइकोसिस बुरशी या रोगाने भिती वाढविली आहे. प्रत्येकालाच म्यूकर माइकोसिस बुरशीचा रोग होतो असे नसले तरी जिल्ह्यात शंभरपेक्षा जास्त रुग्णांना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी नागपुर शहरात 5 बुरशी जन्य रोगाने ग्रसीत रुग्णांचा मृत्यू झाला तर 25 जणांना बुरशीचा आजार झाल्याचे निदान झाले.

नागपुर जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात बुरशीच्या आजाराने शंभरी पार केली. 102 रुग्णांचा जीव बुरशीने महिनाभरात घेतला आहे. तर यामुळे जिल्ह्यात आता 1122 म्यूकर माइकोसिस बुरशीच्या रोगाने बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून बुरशी शरीरात प्रवेश करते. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंत होऊ शकतो. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच या आजारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांत आतापर्यंत 1 हजार 325 म्यूकर माइकोसिसचे रुग्ण आढळून आले. यातील 108 रुग्णांचा बुरशीमुळे जीव गमवावा लागला. यात नागपूरचे सर्वाधिक आहेत. कोरोनानंतर काही तपासण्या करून घेतल्यास बुरशीवर नियंत्रण मिळवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here