नदी काठच्या गावांची समृद्धी टिकवण्यासाठी नदी वाचवा चळवळ उभारणायची गरज.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
वर्धा,दि.3 जुन :- वर्धा जिल्ह्यातील बहुतांश नदीमघून आधूनिक यंत्राच्या सहाय्याने नदिपात्रातील प्रचंड अतिरेखी रेती उपस्यामुळे नद्या विद्रुप झाल्या आहेत काही वर्षांपूर्वी नदीकाठच्या गावांना समृद्धीचे स्वरूप होते वाहत्या नद्यांमुळे परिसरात जलसाठे मुबलक प्रमाणात असल्याने गावाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. परंतु अनेक वर्षांपासून नदीतील वारेमाप रेती उत्खननामुळे जलसूष्ट्री नाहीसी होऊन पाण्याचे नैसर्गिक झरे बंद झाल्याने परिसरात पाणीटंचाई जाणवते शेतकऱ्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे ती ताळ्यावर येण्यासाठी त्यांच्या शेती शिवारातील विहीर, बोर ला पाणी पाहिजे म्हणून ग्रामस्थांनी नशिबाला दोष न देता आपले नदीतील प्रचंड वाळू उपसा थांबवण्यासाठी नेत्यांवर, प्रशासनावर दबाव आणून गावकऱ्यांनी भविष्यातील धोका ओळखून नदी वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे कृषी अभ्यासक्रम प्रा. अजय मोहोड यांनी आपले विचार सदर प्रतीनीघी जवळ व्यक्त केले.
नदीतील वाळू भूजल साठवाणीचा मुख्य घटक असून त्याचा साठा नदीच्या पात्रात असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्यासोबत बारमाही पाणी मिळणे शक्य होते नदी तील पाणी आटल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर नदीतील वाळू मघ्दे पाण्याचा साठा राहतो नदीकाठच्या विहिरीतुन जो ऊपसा होतो त्यावेळेस वाळूतील पाण्यामुळे विहिरीचे पुनर्भरण होत असते यासाठी नदी मघ्दे वाळू असने अत्यंत आवश्यक आहे.आज घडीला भिषन पाणी टंचाई मुळे शेतशिवारातील विहिरी कोरड्या पडल्या आहे रेती उत्खनन करतांना पोकल्यांड,जेसीबीच्या साह्याने शासकीय नियम धाब्यावर बसवून नदी पोखरून काढत असुन वाळू वाहतूक करीता नदीचाकाठ फोडून रस्ते बनवल्याचे निदर्शनास येते त्यामुळे काही गावांना भविष्यात नदीच्या पुराचा तडाखा बसु शकतो आर्थिक देवाणघेवाण मुळे लोकप्रतिनिधी, अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने भविष्यातील पाणीटंचाई धोका टाळण्यासाठी गावकऱ्यांनी एकजूटीने प्रयत्न करून अतीरिक्त रेती उपसावर बंदी आणून ग्रामपंचायतीने, लोकसहभागातून नदीच्या काठाने दिर्घ आयुष्यी वृक्षाची लागवड करून ती टिकवने गरजेचे आहे. युवकांनो पुढाकार घेऊन नदीवाचवा , नदी वाचवू शकले तरच भावीपिढिसाठी जलसाठा चे पुणर्भरण होऊन पिण्याच्या पाण्यासोबतच ,शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊ शकले तर शेती आर्थिक दृष्टीने किफायतशीर बनेल परिसर सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असे कृषिअभ्यासक अजय मोहोड यांनी सांगितले.