अमोल घटे यांच्या पाठपुराव्यामुळे साखरी येथे कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात.

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800
राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा साखरी हे गाव वेकोलीच्या कोळसा खाणींनी वेढलेले असून येथे मोठय़ा प्रमाणावर वेकोली कामगार आणि शेतकरी वास्तव्यास आहेत. या गावातील माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्य करणारे अमोल घटे यांनी गावातील नागरिकांना सोबत घेऊन येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी प्रयत्न केले. आमदार सुभाष धोटे, गटविकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत, वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू कुलमेथे यांना संपर्क करून गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन येथे लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.
साखरी येथे आज कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. यात ४५ वर्षावरिल नागरीकांना कोविड लस देण्यात आली. आज साखरी येथे १०० डोज उपलब्ध झाले. या प्रसंगी कढोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विपीन ओडेला, आरोग्य सेवक कुंभारे व साखरी ग्रामपंचायत चे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच सुरेखाताई गोरे, माझी उपसरपंच अमोल घटे, जि प शाळा साखरी चे मुख्याध्यापक गिलोरकर सर प्रशांत घरोटे, सचिन गोरे व इतर गावकरी उपस्थित होते.