एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602
पाचोरा : तक्रारदारास गुन्ह्यात मदत करून दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात एक लाखाची लाच घेताना मेहुणबारे पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला जळगाव एसीबीच्या पथकाने आज रंगेहात अटक केली. गणेश जगन्नाथ ढिकले (32, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
27 वर्षीय तक्रारदार यांच्या विरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गु.र.नं.0071/2022, भादंवि कलम 115, 118 व 120 ब प्रमाणे 29 मार्च 202 रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या व गुन्ह्यात पोलिस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचच्याकडे आरोपी गणेश ढिकले याने 2 जून रोजी साडेचार लाख रुपये मागितले होते व एक लाख रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मेहुणबारे पोलिस ठाण्यातच आरोपी फौजदाराने लाच स्वीकारताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या व गुन्हा दाखल करण्यात आला.