खरीप हंगामापूर्वी प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. – जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांची मागणी

खरीप हंगामापूर्वी प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.

– जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांची मागणी

खरीप हंगामापूर्वी प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांची मागणी

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड–2019 ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर राज्यसरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून अनेक थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले.. याचा नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झाला परिणामी नेहमी कर्जमाफी ही थकीत शेतकऱ्यांना होते मात्र नियमित कर्ज भरणाऱ्या शेतजाऱ्यांच्या वाट्याला काहीच येत नाही त्यामुळे अश्या शेतकऱ्यांनी सुद्धा कर्ज उचलून थकीत ठेवण्याची भावना निर्माण झाली होती… अश्यातच सर्व स्तरातून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची मागणी केली यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी सुद्धा सरकारकडे वेळोवेळी ही मागणी केली.. अश्यातच सरकारने या नियमित कर्ज शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला. मात्र त्यांनतर या घोषणेवर सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. अश्यातच जिल्हा बँकेचे संचालक यांनी वेळोवेळी सरकारकडे प्रोत्साहन निधी देण्याची मागणी केली,राज्याचे कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली तसेच नागभीड तालुक्यातील सर्वच सेवा सहकारी संस्थां व आदिवासी संस्था यानी एकमताने ठराव घेत प्रोत्साहन निधी लवकरात लवकर देण्याची मागणी मुख्यमंत्री,पालकमंत्री व सहकारमंत्री यांच्या कडे केली.
या सर्व बाबींची दखल घेत सरकारने गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन निधी जमा करण्यासाठी निधीची घोषणा केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला. सध्या घडीला सरकारने या योजनेचा शासन परिपत्रक काढला असून या योजनेची अंमलबजावणी सुरू असून सरकारने लवकरात ही माहिती घेत खरीप हंगामापूर्वी शेतीच्या कामात उपयोगी पडेल या दृष्टीकोन समोर ठेवत प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केली आहे.