खरच महिलांचा सन्मान केला जातो…?

66

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वोच्च पदावर असलेल्या भारत देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांना बोलवले गेले नाही. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा आणि मुलीचे रक्षण करून तिला आदरपूर्वक सन्मान द्या हे सर्व महिलांसाठी बोलण्यातच ठेवण्यापेक्षा जर…प्रत्येक्षात करून दाखवले असते तर

सौ.संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५

या जगातील सर्वात उंच शिखर फक्त,महिलेला म्हटले गेले आहे. हे, वास्तव सत्य आहे म्हणूनच आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे व पुरूषांच्या खांद्याला, खादा लावून कार्य करीत आहे.एक वेळचे ते काम पुरूषाला करणे जमत नाही तेच काम आजची महिला करुन दाखवत आहे हे सर्व ही तिच्यात असलेली हिंमत, मेहनत, धाडस व शिक्षण आहे. म्हणून ती आज संक्षम बणली आहे तेही क्रांतिज्योती सावित्रीआई फुले मुळे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मुळे तसेच होऊन गेलेल्या सर्व महाविभूतींमुळे आज तीची जगात ओळख निर्माण झालेली आहे पण, खरच पाहिजे त्या प्रमाणात तीचा सन्मान केला जातो का..? तिची कदर केली जाते का. .? तिने केलेल्या कष्टाची कदर केली जाते का. .?.याच मातीत जन्माला आलेली लेक शिक्षण घेऊन आज तिची सर्वोच्च पदावर निवड झाली असून सुद्धा एखाद्या शुभ प्रसंगी त्या सोहळ्यात आदरपूर्वक सन्मान दिला जातो का. .? 

असे अनेक प्रश्न आज निर्माण होत आहेत तसेच महिलांच्या विषयी सुध्दा अनेकांच्या मुखातून बाहेर निघताना ऐकायला मिळत आहेत हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे तसेच महिला जातीचा अपमान केला जात आहे. मी एक महिला होण्याच्या नात्याने अशी घटना घडत असताना बघून तसेच वाचतांना अक्षरशः डोळ्यात अश्रू मावत नाही यासाठी जबाबदार कोण असावा असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जर देशाच्या राजधानीत सर्वोच्च पदावर असलेल्या राष्टपती महोदय द्रोपदी मूर्मू यांचा सन्मान केला जात नसेल तर या देशातील महिलांचा खरच सन्मान केला जाईल का. ..? कोण देईल त्यांना सन्मान व आदर…? असा एकही दिवस खाली जात नाही की,महिलांचा अपमान होत नाही,महिलांवर वाढत असलेले अत्याचार , बलात्कार, हुंड्यासाठी तिचा छळ केला जातो, भृणहत्येचे वाढते प्रमाण एवढेच नाही तर कित्येक मुली, महिला रोज बेपत्ता होण्याचे प्रमाण दैनदिन वाढत आहेत मग कुठे आहे महिलांचा सन्मान आणि कुठे आहे महिलांसाठी सुरक्षा आज रक्षक सुद्धा भक्षक बणत आहे. आजही बघायला मिळत आहे.

हे आपण वाचलंत का?

 

असे जर होत राहिले तर…मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा आणि मुलीचे रक्षण करून तिला आदरपूर्वक सन्मान द्या हे सर्व महिलांसाठी बोलण्यातच ठेवण्यापेक्षा जर…प्रत्येक्षात करून दाखवले असते तर. आज राजधानीत राष्ट्रपती महोदयांसोबत असे झाले नसते. एका काळात विधवा महिलांना अशुभ मानल्या जात होते तीला कोणत्याही कार्यक्रमात स्थान दिल्या जात नव्हते पण,क्रांतिज्योती सावित्रीआई फुले मुळे आज ती शिक्षण घेऊन सर्वोच्च पदावर पोहचली. एक महिला होण्याचा मान तीने आपल्या कर्तुत्वाने जगाला करून दाखवून‌ दिले आज ती कशी काय आजच्या विज्ञान युगात अशुभ होऊ शकते…? मागे एकदा विधवा महिलांवर मी लेख लिहिली होती की, “विधवेचा काम करण्यास चालतो छटा पण,तिच्या उपस्थितीत लागतो म्हणे बटा” आज हे सत्य झाले घरी होणारे कार्यक्रम हे वेगळे आहेत पण, संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वोच्च पदावर असलेल्या भारत देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांना बोलवले गेले नाही. हा फार मोठा अपमान आहे हा राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचा तर अपमान आहेच सोबत क्रांतिज्योती सावित्रीआई फुले तसेच सर्व महिला जातीचा आणि होऊन गेलेल्या सर्व महाविभूतींचा अपमान आहे. म्हणजेच आजही कुठेतरी जातीपातीचा भेदभाव केला जात आहे कोणीही नाकारु शकत नाही.
या विषयावर अनेक जण आपआपले मत व्यक्त करत आहेत पण, समोर काय होणार आहे या विषयी कोणालाही माहीत नाही. यात एक गोष्ट जास्त महत्वाची आहे ती म्हणजेच उद्या येणाऱ्या भावी पिढीला जर…कोणी विचारले की, संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात कोण, कोण उपस्थित होते तर..ते,काय उत्तर देणार..? 

आज सर्वोच्च पदावर निवड असलेल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू त्यावेळी का म्हणून उपस्थित नव्हत्या ही घटना येणाऱ्या भावी पिढीला खूप विचार करायला लावणारी आहे. एवढे होऊन सुद्धा संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित नसताना सुध्दा राष्टपती महोदयांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे त्यांचे मोठेपणा आहेत. पण,समोर मात्र महिलांच्या विषयी खूप काही विचीत्र घडणार आहे आहे हे मात्र खरं आहे. कारण आज सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू ह्या, भारत देशातील प्रत्येक महिला जातीसाठी आधार होत्या म्हणून जेव्हा त्यांची राष्टपती पदाची शपत घेतली तेव्हा, आदिवासी समाजसोबतच प्रत्येक जातीधर्मातून त्यांना शुभेच्छा दिल्या गेले पण,आता मात्र राष्टपतीला आदरपूर्वक सन्मान दिला जात नसेल तर. .उद्याच्या दिवशी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलू शकतो. त्यांची वेळोवेळी हिंमत वाढू शकते. म्हणून आतातरी समोर असे न होता महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे. तसेच महिलांनी सुद्धा जागे होणे अत्यंत काळाची गरज आहे.