जोगेश्वरीतील बालविकास मंदिर शाळेत जीवनधारा जायभाये १० वीत ९६ % मार्क्स मिळवून प्रथम

71

जोगेश्वरीतील बालविकास मंदिर शाळेत जीवनधारा जायभाये १० वीत ९६ % मार्क्स मिळवून प्रथम

पूनम पाटगावे

जोगेश्वरी प्रतिनिधी

जोगेश्वरी :- रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व )शाळेचा शालांत परीक्षा २०२३ चा निकाल ९८.४८% लागला आहे. जीवनधारा सुरेश जायभाये ही विद्यार्थिनी ९६% गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या विद्यार्थिनीने कोणताही क्लास न करता हे यश संपादन केले आहे. अभ्यासाबऱोबर वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व अभिनय क्षेत्रात अनेक बक्षिसे मिळविली आहेत. किर्ती मनोज परब ९३.८०% गुण मिळवून शाळेत दुसरी आली आहे. तर मयुरेश मनोहर मेस्त्रीने ९२.८०% मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. शाळेतील ९ विद्यार्थ्यांनी ९०% व त्याहून अधिक मार्क्स मिळविले आहेत.

       संस्थेच्या आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चा शालांत परीक्षा २०२३ चा निकाल ९९.३७ % लागला आहे. आर्या मंगेश चव्हाण हीने ९२.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मनाली मोहन नर ही ९२.२०% गुण मिळवून शाळेत द्वितीय आली आहे. तर कृतिका जयदास पारकर ९०.६०% गुण मिळवून तिसरी आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष सहदेव सावंत, सरचिटणीस जितेंद्र पवार, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे सीईओ विश्वनाथ सावंत, चिटणीस सुरक्षा घोसाळकर, प्रशासकीय अधिकारी अशोक परब, मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे, माजी मुख्याध्यापिका सुशिला पाटील , मुख्याध्यापिका डिंपल दुसाणे, शबशम हुल्लर, शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.