वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवा ; तात्काळ उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्याच्या आ सुभाष धोटेंच्या विद्युत विभागाला सुचना.

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

राजुरा (ता.प्र) :– आशिया खंडातील दुसऱ्या कंमाकावर असलेल्या चंद्रपुर जिल्हयामधुन महाराष्ट्रातील व इतरही राज्यामध्ये विज पुरवठा केला जातो. राज्यामध्ये विज पुरवठा हा चंद्रपुर जिल्हयातुन पुरविला जात आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये सर्वात मोठे विज निर्मीती केंद्र असून सूध्दा चंद्रपुर जिल्हयातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती या तालुक्यात वारंवार विद्युत खंडीत होत असल्याने नागरीकांच्या विद्युतीकरणाच्या वस्तुमध्ये बिघाड येत आहे. उन्हाळा असल्याने नागरीकांना विजे अभावी ४५ ते ५० डिग्री शेल्सियस मध्ये राहावे लागत असुन लहान मुले, वयोवृध्द व इतरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये विज वितरण विभागाचे कार्यप्रणाली विषयी नाराजी पसरलेली आहे.
करीता राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवणेसाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात आणि तप्त उन्हाच्या दिवसात जनतेला अखंडितपणे विज पुरवठा करून दिलासा द्या अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ बाबुपेठ, चंद्रपुर यांना निवेदनाद्वारे केल्या आहेत. अन्यथा आपले विभागाविरूध्द राजुरा शहरातील नागरीकांसह तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.