दिल्ली येथे झालेल्या स्टेअर्स च्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश
महाराष्ट्राने मिळवले कराटे मध्ये पहिले स्थान..
✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
कोकण :-युवा कार्यक्रम, खेल मंत्रालय भारत सरकार , तसेच राष्ट्रीय खेल सवर्धन संस्था (NSPO ) ची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन च्या राष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे या स्पर्धेचे उदघाटन पूर्व खेल मंत्री भारत सरकार मा.श्री.विजय गोयल यांच्या हस्ते झाले,रक्षा राज्य मंत्री, भारत सरकार मा.श्री. संजय शेठ यांनी विडिओ द्वारे संबोधन केले.तसेच इंडियन ऑलिम्पिक च्या अध्यक्ष मा. पी टी उषा यांनी विडिओ द्वारे संबोधन केले.तसेच उदघाटन प्रसंगी स्टेअर्स चे संस्थापक मा. श्री.सिद्धार्थ उपाध्याय ,स्पर्धाप्रमुख मा. श्री.पारस मिश्रा हे उपस्थित होते तर या स्पर्धा त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे संपन्न झाल्या या स्टेअर्स च्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेला संपूर्ण भारतातून साधारण 16 राज्यातून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.ही राष्ट्रीय कराटे स्पर्धा काता व कुमिते या दोन्ही प्रकारे घेण्यात आली ,ही स्पर्धा दिल्ली या ठिकाणी 19 ते 22 मे 2025 रोजी संपन्न झाली.या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातून 70 खेळाडूंनी सहभाग घेतला.त्यामध्ये महाराष्ट्रातील कराटे खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी करून आपले कौशल्य दाखवले व महाराष्ट्राला सर्वात जास्त गोल्ड मेडल मिळवून देऊन महाराष्ट्राला पहिले स्थान मिळवून दिले.
यात मुंबई विभागाने सर्वात जास्त सुवर्णपदक घेतले त्या खालोखाल मराठवाडा विभाग व विदर्भ विभागाने सुवर्णपदक घेऊन महाराष्ट्राची मान उंचावली,त्याबद्दल,स्टेअर्स महाराष्ट्र कराटे टूर्नामेंट चेअरमन क्योशी राजकपूर बागडी सर,स्टेअर्स महाराष्ट्र कराटे प्रमुख शिहान विशाल जाधव सर ,स्टेअर्स चे महाराष्ट्राचे टूर्नामेंट टेक्निकल डायरेक्टर शिहाण गणेश मंगल गिरी सर,यांनी स्टेअर्स महाराष्ट्र कराटे टीम व प्रशिक्षक यांचे कौतुक व अभिनंदन केले प्रशिक्षक बालाजी गिरी, परभणी.प्रशिक्षक देविदास माने, सातारा.प्रशिक्षक सुजित पत्रे,यवतमाळ.प्रशिक्षक लता बारपात्रे, चंद्रपूर.प्रशिक्षक मंगेश दिमटे, ठाणे.प्रशिक्षक मुक्ताई जाधव, मुंबई उपनगर.प्रशिक्षक झेन कंबाता, मुंबई सिटी प्रशिक्षक कल्पेश शिंदे, रायगड.प्रशिक्षक निलेश सोनवणे,जळगाव.या प्रशिक्षकांचे विजयी खेळाडूंना मार्गदर्शन लाभले,तसेच खासदार मा. श्री.संजय दिना पाटील व मा.रजोल संजय पाटील यांनी देखील स्टेअर्स महाराष्ट्र कराटे, स्टेअर्स महाराष्ट्र कराटे टीम व प्रशिक्षक त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.संपूर्ण महाराष्ट्रात सर्व स्थरातून स्टेअर्स महाराष्ट्र कराटे , विजय खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे कौतुक केले जात आहे, त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे