अनोखा वाढदिवस आणि इयत्ता 10 वी व 12 वी च्या विदयार्थ्यांचा गुण गौरव समारभं संपन्न…

अनोखा वाढदिवस आणि इयत्ता 10 वी व 12 वी च्या विदयार्थ्यांचा गुण गौरव समारभं संपन्न…

✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड:- 1 जून म्हणजे तसा असंख्य ज्येष्ठांचा वाढदिवस मास्तरांच्या लेखणीने नोंदवलेला जागतिक वाढदिवस पण याच दिवशी प्रभाग क्रमांक 6 आनंदनगरमध्ये एक कौटुंबिक सोहळा संपन्न झाला.आयपीएल सेमीफायनल मॅचमुळे काहींनी येणं टाळलं असलं तरीही एकही खुर्ची रिकामी नव्हती उत्साह व प्रेमाने भरलेली गर्दी प्रभागातील दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन प्रोत्साहित करण्यात आले.आणि त्यानंतर वाढदिवसानिमित्त प्रभागातील जेष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांना 5 कुमारीकांनी औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या खुद्द उपनगराध्यक्षा हर्षदा काळे मॅडम आणि इतर भगिनींनी सर्वांचे औक्षण केले त्यानंतर उत्साहाच्या वातावरणात वाढदिवसाचे केक कापण्यात आले.

माणगाव नगरीच्या इतिहासात असा अनोखा उपक्रम पहिल्यांदाच अनुभवला.प्रसंगी सर्व वाढदिवस साजरा केलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले दहावी व बारावी परीक्षामद्धे घवघवीत यश मिळालं असल्याबद्दल थोर मोठ्याकडून सत्कार व आशीर्वाद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असा अनोखा कार्यक्रम आयोजित करून सत्कार व वाढदिवस केल्याबद्दल उपनगराध्यक्षा सौं हर्षदा काळे व युवानेते श्री सुमित काळे यांना आशिर्वाद दिले अशेच कार्यक्रम घेऊन प्रभागातील एरियातील नागरिक एकत्र येतात व त्यामुळे एकोपा तयार होत असतो अडी अडचणी कळत असतात त्यामुळेच या संकल्पनेला चालना देत राहण्याची अभिवचन उपनगराध्यक्षा यांनी दिले गोष्ट तशी छोटी पण डोंगराएवढी.या कार्यक्रम प्रसंगी प्रभाग 6 चे अध्यक्ष श्री प्रकाश जाधव, चारिजेन फाऊंडेशन चे संस्थापक कॅप्टन रंधावा सर, उद्योजक श्री राजेश विचारे, डॉ शहा सर, शिवव्याख्याते श्री रामजी कदम सर, श्री दत्ताराम शिर्के सर अडी मान्यवर उपस्थित होते.