शीलसंपन्न मनुष्याची सोबत करावी – डॉ. रमेश राठोड
✍🏻जयंत साठे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.82753 00034
नागपूर :- शीलाचा प्रभाव ईतर लोकांवर पडत असतो त्यामुळे शीलसंपन्न मनुष्याची सोबत करावी असे प्रतिपादन प्रा. डॉ. रमेश राठोड यांनी केले,ते बहुजन हिताय संघाच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रज्ञापीठावर प्रमुख अतिथी म्हणून धम्मपाल देशभ्रतार उपस्थित होते. डॉ. राठोड पुढे म्हणाले की, सर्वांचे कल्याण व्हावे हिच बुध्दी असावी. देव नावाच्या संकल्पनेने जातीयता निर्माण केली होती. तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मनुष्याच्या कल्याणकारी विचारवंत आहेत असेही ते म्हणाले.
संविधान निर्मितीला 75 वर्षे झाली त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर मध्ये वामन सोमकुंवर यांनी कार्यक्रम आयोजित केला होता, त्या प्रित्यर्थ त्यांचे बहुजन हिताय संघातर्फे पुष्प गुच्छ आणि संस्थेचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
आजच्या सभेचे प्रमुख अतिथी धम्मपाल देशभ्रतार यांनी सांगितले की,धम्मपद हा तथागत बुद्धांच्या वाणीचा अनमोल ग्रंथ आहे,सुत्तपिटिकाचे लेखन भन्ते महाकश्यपाने केले आहे त्यात 84000 सुत्रे आहेत असे सांगून त्यांनी त्रिपिटिक व कालामसुत्ताची सखोल माहिती दिली. तसेच अनात्मवाद,कालामसुत्त ,व अस्सलायन सुत्रातील समता, स्वातंत्र्याचे विचार सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव ॲड हंसराजजी भांगे, राष्ट्रगीत प्रा नंदाताई भगत, सुत्रसंचालन आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ शंकर खोब्रागडे यांनी केले. प्रतिज्ञा व धम्म पालन गाथा बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटली.