पहेलगाम हल्ल्यात शहिद झालेल्या मृत्यांच्या घरी ‘हम भारत के लोग अभियान नांदेड” सदस्यांनी घेतली सांत्वन भेट

पहेलगाम हल्ल्यात शहिद झालेल्या मृत्यांच्या घरी ‘हम भारत के लोग अभियान नांदेड” सदस्यांनी घेतली सांत्वन भेट

शिलरतन लोखंडे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मो. 8308653814

नांदेड : हम भारत के लोग यांच्या माध्यमातून सद्भाभावना अभियान नांदेड ते जम्मू -काशमिर अंतर्गत दि. 1/06/2025 पहेलगाम येथील हातनाडा या गावी पोहोचलो दिनांक 22/4/025 रोजी पहेलगाम येथील पर्यटन स्थळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ‘सय्यद अदिल हुसेनशाहा” घोडा हकनारा हा अतिरेक्यांची बंदूक हिसकावून पर्यटकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होता परंतु त्या झटापटीत त्याला गोळ्या लागून जागीच शहीद झाला. एक मुस्लिम असून त्याने कित्येक हिंदू -मुस्लीम बांधवांचे प्राण वाचवले. म्हणून संपूर्ण देश त्याला सलाम करतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी,आई,भाऊ, बहिण या सर्वांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी सद्भावना अभियान जथ्था नांदेड जिल्ह्यातील कॉ.विजय गाभणे, श्याम निलंगेकर,अभियंता भरतकुमार कानिंदे, प्रा.प्रल्हाद हिंगोले, संगीता गाभणे, पत्रकार रमेश मस्के, सोपानराव मारकवाड, नारायणराव दंतुलवाड व अनंतनाग जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.