मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कार-कंटेनरच्या भीषण अपघात, आई-वडील व मुलाचा जागेवरच मृत्यू.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,03 जुलै:- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एका भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार दि.1जुलै रोजी हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वीकडे हयगय व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यावरुन जात असलेल्या एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारला भीषण धडक बसली. त्यामुळे हा अपघाट झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारला आग लागली व त्यात आई-वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली होती.अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गावरील पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले होते. कारला आग लागल्यामुळे तातडीने अग्निशमन बंब बोलावण्यात आले व कार विझवण्यात आली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अद्याप मृतांची नावं समजू शकलेली नाही. मात्र हे तिघे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होते. तेव्हा त्यांच्यावर काळाने घाला घातला.