महाराष्ट्र कृषिदिन निमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर सत्कार.

महाराष्ट्र कृषिदिन निमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर सत्कार.

शिवराया विद्यार्थी संघटनेचा बळीराजा सन्मान उपक्रम.

महाराष्ट्र कृषिदिन निमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर सत्कार.
महाराष्ट्र कृषिदिन निमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर सत्कार.

प्रा. अक्षय पेटकर✒
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
अल्लीपुर:- शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने कृषिदिन निमित्त दरवर्षी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो, यावर्षी सुद्धा थेट बांधावर जाऊन शेतकरी सुधाकर चंदनखेडे यांचा सत्कार करण्यात आला व पुढील हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, एकीकडे कोरोनाने जगातील सर्व कंपन्या बंद असताना मात्र शेतकऱ्यांची कृषी कंपनी मात्र सुरळीत आहे अशा जगाच्या पोशिंद्याचा मान सन्मान व्हावा म्हणून शिवराया विद्यार्थी संघटनेने थेट शेताच्या बांधावर जाऊन सत्कार केला यावेळी अल्लीपुर मंडळ अधिकारी संजय भोंग, तलाठी निशानकर, तलाठी रामटेके, शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष नितीन सेलकर, मार्गदर्शक कैलास घोडे,उपाध्यक्ष विकास गोठे, श्रुनय ढगे, निशांत लांभाडे, रोशन नरड, मयूर डफ, दिनेश गुळघाणे व पदाधिकारी उपस्थित होते.