*मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेशाच्या सूचना*
✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961
नांदेड (जिमाका) दि. 3 :- आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रात साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा यासाठी नांदेड जिल्ह्यात 2021 करिता मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच 20 पेक्षा अधिक बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यवसायिक प्रशिक्षण संस्था म्हणुन सुचिबद्ध होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत. हे संपुर्ण प्रशिक्षण उमेदवार, लाभार्थ्यांना पूर्णपणे नि:शुल्क असून सुचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल.
या कार्यक्रमांतर्गत अधिकृत प्रशिक्षण केंद्राचे नाव डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) एमरजंसी मेडीकल टेक्निशीएन – बेसीकसाठी शैक्षणिक पात्रता 12 विज्ञान. जनरल ड्यूटी असिस्टंट- 8 वी, होम हेल्थ एड- 8 वी, फ्लेबोटॉमीस्ट- 12 वी शैक्षणिक पात्रता असावी.
एसजीजीएस स्मारक शासकीय रूग्णालय शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नांदेड येथे उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) सेंन्ट्रल स्ट्राइल सर्व्हिस डिपार्टमेंट असिस्टंटसाठी शैक्षणिक पात्रता 12 विज्ञान, हॉस्पीटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर-12 वी, मेडिकल इक्यूपमेंट टेक्नॉलजी असिस्टंट- आयटीआय/डिप्लोमा संबधीत क्षेत्राशी, मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन- 12 विज्ञान.
शासकीय महिला रूग्णालय श्यामनगर नांदेड येथे उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) फ्लेबोटॉमीस्ट- 12 वी, ड्रेसर (मेडिकल)- 10 वी, जनरल ड्यूटी असिस्टंट- 8 वी, जनरल ड्यूटी असिस्टंट-ॲडव्हांन्स- 10 वी, मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन- 12 विज्ञान, सॅनेटरी हेल्थ एड- 10 वी.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय वजिराबाद नांदेड उपलब्ध अभ्यासक्रम (कोर्सेस) असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर- 8 वी, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक सहायक- 10 वी, आयुर्वेदा डायटीशीयन बीएएमएस, कुपिंग थेरपी असिस्टंट- 10 वी, क्षारा कर्मा टेक्निशियन- 10 वी, पंचकर्मा टेक्निशियन- 12 वी, योगा थेरपी असिस्टंट- 12 वी, योगा वेलनेस ट्रेनर- 12 वी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.