50 हजाराचे इनाम असलेला महिला आणि मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेडया.

50 हजाराचे इनाम असलेला महिला आणि मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेडया.

50 हजाराचे इनाम असलेला महिला आणि मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेडया.
50 हजाराचे इनाम असलेला महिला आणि मुलीवर बलात्कार करणारा नराधम बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेडया.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
लखनऊ,दि.3 जुलै:- आज मोठ्या प्रमाणात बलात्कारी बाबा संत यांच पीक आल आहे. श्रद्धेच्या नावावर हे नराधम बाबा संत महिला मुलीच्या आबरु बरोबर खेळत आहे. एशाच एक नराधम बलात्कारी बाबाला पोलिसांनी अटक करुन बेड्या ठोकल्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये 50 हजाराचे इनाम जाहीर असलेला बलात्कारी नराधम बाबा सच्चिदानंद याला मुरादाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याला बस्ती पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आलं आहे.

नराधम बलात्कारी सच्चिदानंद गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. आश्रमात राहाणाऱ्या महिला आणि मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि अपहरणासारखे अनेक गंभीर आरोप त्याच्यावर होते. सच्चिदानंद यानं या घाणेरड्या कृत्यासाठी आपली वेगवेगळी नावं ठेवली होती. लोकांना तो दयानंद, भगतानंद, प्रशांत कुमार आणि संत कुमार अशा वेगवेगळ्या नावांनी भेटत होता. सच्चिदानंद हा मूळचा बिहारच्या मीठापूरच्या गुमटी परमा येथील रहिवासी होता. बस्ती जिल्ह्यातील लालगंज ठाणा क्षेत्राच्या सेल्हरा संत लोक आश्रम रिलिजिंग ट्रस्टचा तो संचालक होता. याठिकाणी त्याच्या आश्रमातील साध्वींनीच त्याच्याविरोधात सामूहिक बलात्कारासह अन्य गंभीर आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर तो फरार झाला होता. त्याच्या अटकेची आणि न्यायाची पीडित महिला सातत्यानं मागणी करत होत्या. पोलिसांनी या आरोपीचा शोध लावणाऱ्याला 50 हजार ईनाम देणार असल्याचंही जाहीर केलं होतं.

पोलिसांनी सांगितलं, की सच्चिदानंदसह इतर काहींवर महिलांना बंधक बनवून सामूहिक बलात्कार करण्यासह इतरही गंभीर गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले मात्र हे आरोपी हाती लागले नाहीत. मात्र, आरोपीचा एक शिष्य परमचेतानंद आणि सेविका उर्मिला यांना 5 ऑगस्ट 2018 रोजी बभनान रेल्वे स्टेशनवरुन अटक करण्यात आली.

डिसेंबर 2017 मध्ये लैंगिक शोषणाचं हे प्रकरण समोर आलं. पीडित महिलांनी असे आरोप केले होते, की सत्संग आणि प्रवचनाच्या नावावर महिलांना आणि कमी वयाच्या मुलींना आश्रमात बोलवलं जात असे, यातील काहींना साधवीचा दर्जा देऊन आश्रमात ठेवलं जात असे. यानंतर त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी दिल्लीमधील आश्रमाच्या मुख्यालयात आणि इथल्या कथित बाबाच्या अनुयायांच्या निर्देशावर वेगवेगळ्या शहरांत प्रवचन आणि सत्संगसाठी पाठवलं जात असे आणि लैंगिक शोषण केलं जात असे.