नवदाम्पत्यास चोरानी केली बेदम मारहाण, पतीचा मृत्यु, पत्नीची मृत्यशी झुंज सुरु.

नवदाम्पत्यास चोरानी केली बेदम मारहाण, पतीचा मृत्यु, पत्नीची मृत्यशी झुंज सुरु.

घाट की अपघात? पोलीस करत आहे सखोल चौकशी.

नवदाम्पत्यास चोरानी केली बेदम मारहाण, पतीचा मृत्यु, पत्नीची मृत्यशी झुंज सुरु.
नवदाम्पत्यास चोरानी केली बेदम मारहाण, पतीचा मृत्यु, पत्नीची मृत्यशी झुंज सुरु.

✒️औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी✒️
औरंगाबाद,दि.3 जुलै:- औरंगाबाद जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरानी बेदम मारहाण केली यात 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीरपणे जखमी झाली आहे. तिची रुग्णालयात मृत्यशी झुंज सुरु आहे. दि.1 जुलै गुरुवारला मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खांबाला फाटा वस्तीवर ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की मग या मागे काही दुसरे कारण होते याचा शोध पोलीस घेत आहे. मयत राजेंद्र जिजाराम गोरसे वय 25 वर्षे, असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहिनी राजेंद्र गोरसे वय-24 वर्षे असं मृत्यूशी झुंज देत असलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

गोरसे परिवाराने रात्री सोबत जेवण केले. त्या नंतर राजेंद्र आणि तिची पत्नी मोहिनी दोघेही त्यांच्या खोलीत झोपायला गेले तर राजेंद्रचे आई-वडील आणि बहीण असे तिघे दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दरम्यान मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोर त्यांच्या घरात शिरले पहिल्यांदा बाजूच्या खोलीत झोपलेल्या राजेंद्रच्या आई-वडिलांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. आणि नंतर राजेंद्र यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. दरम्यान राजेंद्र आणि त्यांच्या पत्नी झोपेतून जागे झाले. दोघेही समोर येताच आरोपींनी या नाव दाम्पत्यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात राजेंद्र रक्तबंबाळ होऊन जागीच मृत पावले तर मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मात्र आई-वडिलांच्या आरडाओरडीने गावकरी धावत त्यांच्या घराकडे येत होते. ते पाहून आरोपींनी धूम ठोकली. गावकऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडल्याचे पाहून गावकारीही घाबरले. त्यांनी तातडीने आई-वडिलांची बंद खोलीतून सुटका करीत पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपवीभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजपूत यांचं पथक घटनस्थळी आले. त्यांनी लगोलग श्वान पथकाला पाचारण केले.