मॉडेल च्या विद्यार्थिचे स्वप्न होणार का पूर्ण ?
? वंचित व गरीबान कड़े सरकारचे दुर्लक्षच
✍🏻✍🏻 अमितकुमार त्रिपटी अहेरी उप जिल्हा प्रतिनिधि
✍🏻✍🏻✍🏻
सिरोंचा : – जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा येथे मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत या मॉडेस्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरीब, वंचित विद्यार्थ्यांच्या भविष्याचे ‘मॉडेल’ बनविणाऱ्या या मॉडेल स्कूलमध्येच शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.
गरीब आणि वंचित मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने शासनाने राज्यभरात 2012 मध्ये मॉडेल स्कूल सुरु केल्या. अविकसीत गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मॉडेल स्कूलची निर्मिती करण्यात आली. यामध्ये राज्य व गडचिरोली जिल्ह्याच्या
शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात सुद्धा एक मॉडेल स्कूल सुरु करण्यात आले. मात्र सदर मॉडेल स्कूलमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शाळेत आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. 4 पैकी 1
शिक्षिका प्रस्तुति रजे वर गेलेली आहे 3 शिक्षक कार्यरत: सिरोंचा येथील मॉडेल स्कूलमध्ये परिसरातील वंचित व गरीब कुटूंबातील एकूण 170 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी उच्चशिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून या मॉडेल आपले भविष्य मॉडेल बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
इंग्रजी माध्यमाची एकमात्र शाळा
सिरोंचा येथे 2012 मध्ये मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षी 6 वीपर्यंत वर्ग भरविण्यात आले. आता सद्यस्थितीत 10 वी पर्यंत वर्ग सुरु आहेत. सध्या सर्वत्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बोलबाला आहे. मात्र तालुक्यातील खाजगी शाळांमध्येच इंग्रजी माध्यमाची शिक्षण मिळत आहे. मॉडेल स्कूल ही एकमात्र सरकारी शाळा आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळत आहे. त्यामुळे गरीब कुटूंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी ही शाळा ध्येय गाठण्यासाठी एक पायरी ठरत आहे. मात्र अन्य सरकारी शाळांप्रमाणे या शाळेत सुद्धा शिक्षकांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.