जेतवन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने “कौतुक सोहळा आणि स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न”

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मो: ९८६९८६०५३

मुंबई:-दि. २ जुलै २०२३ रोजी मुंबईच्या सायन (पुर्व) मधील प्रतिक्षा नगर च्या माला गार्डन समोरील नामंकित जेतवन बुध्द विहार येथे २०२२- २०२३ वर्षातील दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याबद्दल जेतवन सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) यांच्या मार्फत जाहिर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

ह्या सोहळ्याचे औचित्य साधुन भारत देशात सनदी अधिकारी घडविण्यात अग्रेसर असणारी प्रख्यात संबोधी करियर ॲकडमी चे सुप्रसिध्द संचालक मंगेश बोरकर सर यांचे “स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन शिबीर” भरविण्यात आले होते. 

ह्यावेळी बहुसंख्येने उपस्थित पालकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युपीएससी तून आयएएस ते आयपीएस तर एमपीएससी, स्टाफ सेलेक्शन, बँक स्टाफ, आयबी, ईपीएफओ तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सारख्या सेवादलातील एनडीए ते सीडीएसई अशा मोठ्या स्वप्नांना प्रत्यक्षदर्शी उतरविण्यासाठी शिक्षणाचा मुळ गाभारा कसा निर्माण कराव्यात? तसेच, दहावी आणि बारावी उत्तीर्ण करूनही पर्यायी स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासन अधिकारी कसे होता येईल? यासंदर्भात सुटसुटीत रित्या पालकांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधत मंत्रमुग्ध पध्दतीने बहुसंख्येने उपस्थितांना बोरकर सरांनी मार्गदर्शन केले. 

त्यानंतर वर्ष २०२२ – २०२३ मधील दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याबद्दल जेतवन सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, गौरवपत्र, शालेय उपयोगी फाईल फोल्डर आणि फुलगुच्छ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला. वैशिष्टपूर्ण ठरले ते सालाबादप्रमाणे इयत्ता दहावीचा शंभरटक्के रिझल्ट देणा-या सायन (पुर्व) मधील ज्ञानविकास नाईट हायस्कूल चे बहुसंख्येने उपस्थित प्रौढ विद्यार्थी वर्गाची ज्याच्यातील अनेकजण साठ टक्के वरील टक्केवारीने उत्तीर्ण झालेल्यांची.  

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जेतवन सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या पदाधिका-यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वीरित्या संपन्न झाला.  

आधुनिक काळाची गरज ओळखून असे स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन शिबीर सह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहिर सोहळा आयोजित करणे आवश्यक आहे. तरच युवापिढीला यशाची योग्य दिशा मिळू शकेल आणि आदर्श प्रशासकीय यंत्रणा निर्माण होऊन जागतिक पातळीवर भारत देशाचे नाव उज्ज्वल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here