बीआरएस पक्षाला जे लोक भाजपाची बी टीम समजत होते तेच आता भाजपासोबत जात आहेत – शेतकरी नेते संतोष पाटील

53

बीआरएस पक्षाला जे लोक भाजपाची बी टीम समजत होते तेच आता भाजपासोबत जात आहेत – शेतकरी नेते संतोष पाटील

जितेंद्र कोळी

पारोळा तालुका प्रतिनिधी

मो: 9284342632

जळगाव – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय गलिच्छ पद्धतीने फोडाफोडीचा जो प्रकार चालला आहे तो अतिशय किळसवाणा आहे, कुठल्याच पक्षाची स्वतंत्र अशी विचारधारा शिल्लक राहिलेली नाही कुठलाच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रातील जनतेचा विचार करत नाही, राष्ट्राचा उन्नतीचा विचार यांच्या मनामध्ये येत नाही. कुठल्या पक्षामध्ये फूट पडेल कुठल्या पक्षासोबत कोण जाईल हे आता सांगता येत नाही, आधी शिवसेना फुटली आता राष्ट्रवादी फुटली या महाराष्ट्रात काय चाललंय काहीच कळत नाही, भारत राष्ट्र समिती बद्दल जे लोक अपशब्द बोलत होते बी. आर. एस. पक्षाला भाजपाची टीम म्हणून टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच इतर पक्षाचे लोक आज भाजपासोबत लगीनगाठ बांधत आहेत.

खरे म्हणजे आज रोजी ह्या महाराष्ट्राला सशक्त असा पर्याय फक्त भारत राष्ट्र समितीच देऊ शकेल असे आता वाटायला लागले आहे, म्हणून बी. आर. एस. नावाचं गुलाबी वादळ महाराष्ट्रात घोंगावतय. ही शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्रातील स्थानिक शेतकरी संघटना सोडून राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारत राष्ट्र समितीत प्रवेश घेऊन गावागावात शाखा स्थापन करत आहेत, काही वर्षांपूर्वी निर्माण झालेले तेलंगणा राज्य व त्या राज्यातील कार्यपद्धती शेतकऱ्यांसाठी व सामान्य माणसासाठी असलेल्या कल्याणकारी योजना जल, बीज, वीज, आणि पेरणीसाठी वेळेवर लागणारं अर्थसहाय्य या सगळ्या गोष्टी देत आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बोकांडी बसलेलं सरकार व इथली दावणीला बांधलेली शेतकरी नेते याच्यामध्ये तफावत दिसल्याने ही शेतकऱ्यांची पोरं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपसुकच बी. आर. एस. कडे ओढले जात आहेत.

आता महाराष्ट्रातील शेतकरी संघटने कडे कार्यकर्ते नसल्याने काही स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे या पक्षाबद्दल व या कार्यकर्त्यांबद्दल आपल्या तोंडातून गरळ ओकत आहेत, खरं म्हणजे इतके वर्ष आळीपाळीने बदलून आलेल सरकार शाश्वत असे शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकले नाही, आणि शेतकरी नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चांगल्या प्रकारे जोर लावलेला नाही, फक्त आपण आमदार मंत्री कसे होऊ आपली राजकीय पोळी कशी शेकून घेता येईल याचाच विचार केला, आता ह्या बी. एस. आर. नावाच्या राजकीय पक्षांने या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी नेत्यांच्या पायाखालची माती घसरवलेली आहे.