एकीकडे प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर दुसरीकडे राजकीय गुलाल…हे कसले लोकप्रतिनिधी?

रमेश कृष्णराव लांजेवार

मो: 9921690779

दिनांक 1 जुलै 2023 रोज शनिवारला समृद्धी महामार्गावर अंगावर शहारे येणारी भयावह घटना घडली व यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारत स्तब्ध झाला व सर्वत्र शोककळा पसरली.मृतांचा अंतिमसंस्कारसुध्दा व्हायला आहे.परंतु अचानक दिनांक 2 जुलैला 2023 रोज रविवारला अचानक दुपारी राजकीय उलथापालथ दिसून आली.या उलथापालथमध्ये शोकाकुल परिवार आपल्या शोकामध्ये डुबून आहे व अजुन पर्यंत शोक सावरलेला नाही. परंतु राजकीय पुढारी राजकीय खेळीसाठी व स्वतःच्या स्वार्थापोटी शोकाकुल परिवाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते व स्वतः खुशी साजरी करतांना दिसतात.याकरीता मीडिया समोर येवून व प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली खुशी जाहीर करतात व मत मांडताना दिसतात.परंतु लोकप्रतिनिधींना मृतांच्या नातेवाईकांच्या घरापर्यंत जाण्यास वेळ नाही.मृतांच्या नातेवाईकांच्या जखमा ताज्या असतांना अशाप्रकारची राजकीय खेळी खेळने म्हणजे लोकप्रतिनिधी या नावाला कलंकित केल्या सारखे आहे.ही कसली मानुसकी व कसले लोकप्रतिनिधी म्हणावे!

कारण आज महाराष्ट्र सरकार व सरकारमध्ये सहभागी झालेला राष्ट्रवादी पक्ष यामुळे राजकीय वर्तुळात खुशीने आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना मंत्रीपदाची वर्नी लागल्याने राज्यात अनेक ठिकाणी गुलाल सुध्दा उधळण्यात आला याला कोणते राजकारण म्हणावे.घरचा कोणीही व्यक्ती मृत पावतो तेव्हा संपूर्ण परिवार कमीत कमी तीन दिवस शोकमनवितो नंतर दुसरे कार्य करतो.परंतु सर्वांच्या सामोरं समृद्धी महामार्गवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला व यात होरपळून 25 प्रवाशांचा अंत झाला.यामुळे महाराष्ट्रासह देशात शोक सुरू असतांना महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी मंत्रीपदाची शपथ घेतात व खुशी जाहीर करतात यापेक्षा जनमानसाचे मोठे दु:ख कोणते म्हणावे!पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनांक 27 जून 2023 ला विरोधकांवर 20 लाख कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता यात कॉग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस व मुख्यत्वे करून राष्ट्रवादी काँग्रेस याची भ्रष्टाचाराची यादी लांबलचक असल्याचे मोदींनी म्हटले.यामुळे राष्ट्रवादी नेत्यांचे धाबे दणाणले.कारण आज ज्यांनी-ज्यानी मंत्रीपदाची शपथ घेतली ते सर्वच भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत व जेही राष्ट्रवादीचे आमदार सत्तेसोबत गेले आहेत त्यांच्यामागे ईडीसह अनेक कारवाया सुरू आहे.यावर पांघरूण घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाले.परंतु मानुसकी या नात्याने मृतांच्या नातेवाईकांना व शोकाकुल परिवाराला विसरल्याचे दिसून येते.

कोणत्याही पक्षांच्या राजकारण्यांनी राजकारण अवश्य करावे व खेळावे.परंतु परिस्थितीत पाहुन राजकीय डावपेच खेळले तर बरं राहील.अन्यथा लोकांचा राजकारण्यावरून विश्वास उडेल.महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी इतका लालचीपणा कधीच दिसला नाही.एकिकडे अंत्यविधीचा शोक तर दुसरीकडे शपथविधीचा उत्साह वारे राजकाण्यांनो धन्य आहे तुम्ही.यावरून स्पष्ट झाले आहे की राजकीय पुढारी सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जावु शकते.हे आज झालेल्या राजकीय उलथापालथ वरून लक्षात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here