भारत राष्ट्र समिती पक्ष हाच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात प्रमुख पक्ष असेल -बीआरएस पार्टीचे जेष्ठ नेते मा. आमदार शंकर आण्णा धोंडगे साहेब यांचे वक्तव्य
✍🏻 *जितेंद्र कोळी* ✍🏻
*पारोळा तालुका प्रतिनिधी*
*संपर्क न.-9284342632*
*मुंबई* – महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचा विचार करता काल- परवा बीआरएस ला बी टीम म्हणणारे आज कुठे आहेत.? म्हणून खरंच कोण भाजपची बी टीम आहे हे आता जनतेला दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील मोठे-मोठे नेते आता नक्कीच मोडीत निघतील. आताचे शिंदे साहेब, फडणवीस साहेब व अजित दादा यांचे सरकार पुढे बीआरएस पक्ष हे एकमेव मोठे आव्हान आहे..महाराष्ट्रातील जनता हा तमाशा बघत आहे,
बीआरएस पक्ष तसेच केसीआर साहेबांनी महाराष्ट्राला जो विकासाचा अजेंडा दिला आहे. त्याला सर्व जनतेने उस्फूर्तपणाने साथ दिली आहे. या पुढचे काळात बीआरएस ला फार मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळेल. तसेच येणाऱ्या काळात बीआरएस पक्ष सत्ता प्रस्थापित करेल हे मात्र निश्चित आहे.