*अंनिसने थांबवली काळा गोटा परिसरातील भानामती*
*अ.भा अंनिसची भर पावसात प्रबोधन सभा*;
*गोटमार मानवी कृतीतून*

*अ.भा अंनिसची भर पावसात प्रबोधन सभा*;
*गोटमार मानवी कृतीतून*
आशीष अंबादे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट :०३/०८/२१ – शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेली काळा गोटा परिसरातील गोटमार अखेर अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या भर पावसात घेतलेल्या प्रबोधन सभेनंतर थांबल्याची परिसरातील नागरिकांनी माहिती दिली. गोटमारीमुळे परिसरासह जिल्ह्यात अनेक भ्रामक चर्चांना ऊत आला होता .ही गोटमार मानवी कृतीतूनच होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अखेर गोटमार प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.
२४ जुलै पासून हिंगणघाट शहरातील चोखोबा वार्डातील काळागोटा परिसरात आपोआप गोटे घरावर पडणारी भानाभती होत असल्याचे वृत्त समाज माध्यमावरून विडिओसह पसरले. ते विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाले. यानंतर सर्वत्र भ्रामक अफवांचा महापूर चर्चेतून वाहू लागला होता. ब्रिटिशकाळातील भारताचा मध्यबिंदू हिंगणघाट शहरात ज्या ठिकाणी शोधल्या गेला . तिथे शुशोभित आकार दिलेले काळे पाशान असलेल स्मारक तयार करण्यात आले आहे . जो शहरात काळा गोटा परिसर म्हणून प्रसिद्ध आहे. ज्याने भारताचा तो मध्यबिंदू शोधला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची समाधीसुद्धा शेजारीच तयार करण्यात आली. त्याच ब्रिटिश अभियंत्याचा आत्मा गोटे मारतोय. स्मारकातून एक शिर व चार हात बाहेर येतात, घटणास्थळाच्या परिसरात राहणा-या युवकाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्या युवकाच्या अतृप्त आत्माचेच हे काम आहे. कारण तो हा परिसर स्वच्छ ठेवायचा , आता तो अस्वच्छ झालाय म्हणून तोच रागात हे करतोय. दगडात चुंबक आहे. ते आपोआप हवेत तरंगतात आणि अलगद पडतात, या सारख्या अनेक काल्पनिक कथा रचल्या व पसरवल्या जात होत्या . पोलिस ठाण्यात परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर दोनचारदा पोलिसांनी कसून चौकशी केली पण गोटमार थांबली नाही. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणि करणा-यांची हिंमत वाढली. प्रकरणाचा छडा लावावा व हा प्रकार थांबवावा. अशी लेखी विनंती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा वर्धा शाखेकडे परिसरातील जागृक महिला , युवक , नागरिकांनी पत्रकारांच्या माध्यमातून केली. या संदर्भात अधिक माहीती घेण्यासाठी हिंगणघाट पोलिस स्टेशन तेथे अंनिस चमू पोहचली. पोलिस उप निरिक्षक अभिषेक बागडे यांच्याशी चर्चा करून
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे , वर्धा जिल्हा सचिव निलेश गुल्हाने , जिल्हा भंडाफोड प्रमुख प्रफुल्ल कुडे , हिंगणघाट तालुका शाखा अध्यक्ष राजश्री विरूळकर , सहसचिव पंकज येनुरकर, वर्धा तालुका शाखा संघटक रवी पुनसे, युवा शाखा वर्धा जिल्हा संघटक सुमित उगेमुगे , सदस्य गिरीधर कोठेकर, हिंगणघाट तालुका युवा शाखा संघटक निखील ठाकरे , समुद्रपूर तालुका युवा शाखा संघटक संजीत ढोके , सदस्य हर्षल उमरे , गौरव दोंदल यांच्या सत्यशोधन समितीने परिसर गाठला. तिथे सलग पाच तास शोध मोहीम राबवली. या दरम्यान परिसरातील सर्व नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रकारे मुलाखती घेण्यात आल्या. येणा-या दगडांच परिक्षण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला . सायंकाळी भर पावसात पंकज वंजारे यांनी प्रबोधन सभेत मार्गदर्शन केले. यावेळी गोटमारी मागील कारणमिमांसा करण्यात आली. आत्मा , भुत , करणी, जादुटोणा विरोधी कायदा आदी विषयांवर यावेळी नागरिकांना माहीती देण्यात आली. वास्तविक परिस्थिती नागरिकांसमोर आल्यानंतर त्यांच्या मनातील भिती निघाली असून त्यांनी सुटकेचा नि :श्वास टाकला आहे.
……
ही घटना मानवी कृतीतून
ही घटना मानवी कृतीतून घडत होती.
या कृतीत सहभागी परिसरातील नागरिकांमध्ये आत्मा ,अतेद्रीय शक्तीची दहशत निर्माण करत होते. तर काही खोंडसाळपणातून विकृत आनंद मिळवत होते. यामुळे अनेक लहान – मोठे प्रचंड घाबरून होते. त्यांना आधार देत. कुठलीही कृती आपोआप घडत नाही. ही बाब आम्ही काळा गोटा परिसरातील नागरिकांना पटवून दिली आहे. काही सुचना सुद्धा त्यांना खासगीत व जाहीरपणे दिल्या आहेत. घरांवर गोटे येण्याचा प्रकार थांबला आहे. हिंगणघाट शाखा प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे.
– पंकज वंजारे
महाराष्ट्र राज्य युवा संघटक अ.भा.अंनिस