“दो जिस्म एक जान” मृत्यूनंतर स्मशानात लागल प्रेमीयुगुलाचं लग्न

विशाल सुरवाडे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव, 02 ऑगस्ट:- जळगाव जिल्हातील भडगाव तालुक्यातील वाडे या गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलांनी फ्रेंन्डशीफ दिनाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण जळगाव जिल्हा हादळला आहे.
वाडे या गावात राहणा-या परिवारानी प्रेमविवाहाला करण्यास नकार दिल्याने प्रेमीयुगुलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. जिवंतपणी मुलांचं प्रेम न कळालेल्या पालकांनी मात्र मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्याचं लग्न लावून दिलं आहे. अग्निडाग देण्यापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांनी संबंधित जोडप्याचं स्मशानभूमीत विधीवत लग्न लावून देत त्यांची लग्नाची इच्छा पूर्ण केली आहे. मैत्रीदिनीच जोडप्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुकेश कैलास सोनवणे वय 22 वर्ष आणि नेहा बापू ठाकरे वय 19 वर्ष असं आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावं आहेत.
प्राप्त माहितीनुसार मृत नेहा आणि तिचे कुटुंबीय मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या मामाच्या गावाला भडगाव तालुक्यातील वाडे याठिकाणी वास्तव्याला आले होते. याठिकाणी राहत असताना, नेहाची ओळख वाडे येथील रहिवासी असलेल्या मुकेशशी झाली. या दोघात प्रेमाचे अंकुर फुलू लागले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पार बुडाले होते. पण त्याच्या प्रेमाचं गुपित फार काळ गुप्त राहिलं नाही. दोघांत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना मिळाली. दोघंही एकाच समाजाचे होते. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या घरच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
पण मुकेश हा नेहाचा नात्यानं चुलत मामा लागत असल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. त्यामुळे मुकेश आणि नेहाच्या प्रेमविवाहाचा आशा धुसर होत गेली. यातूनच मुकेश आणि नेहानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
दोघांनी 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान वाडे येथे नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या इमारतीतील एका लोखडी सळईला गळफास लावून आत्महत्या केली आहे. 1 ऑगस्ट रोजी सकाळी दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. यावेळी घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही.
शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांची एकाच वेळी पण वेगवेगळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी स्मशानभूमीतच दोघांचं विधीवत लग्न लावून दिलं आहे. यावेळी गावातील अनेक नागरिक याठिकाणी उपस्थित होते. पोलिसांनी दोघांबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली आहे. पोलीस या घटनेचा चहुबाजूंनी तपास करत आहेत.