डाॅ. उमेश वावरे यानच्या नेतृत्वात कामगाराचे एक दिवसीय धरने आदोलन.

✒आशीष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- हिंगणघाट येथील 100 वर्षापेक्षा जुन्या असलेल्या मोहता मिल संचालकाने बंद केला. हा एक प्रकारे कट कारस्थान करु हजारो लोकाला गरिबीची भुखमरीच्या खाईत लोटले आहे. हजारो कामगार आज बेरोजगार झाले असतांना जिल्हा प्रशासन कुंभकर्णीय झोपेचे सोंग घेऊन झोपुन आहे.
आम्ही 14 जून रोजी मिल कामगार च्या मागणी करिता जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले. त्यावर काही, तोडगा न निघालाने पुन्हा आम्ही 5 जुलै ला एक निवेदन दिले.
परंतु आता पर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही म्हणून आम्ही सर्व मिल कामगार 2आगस्ट रोजी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट याच्या समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करीत आहोत. तरी शासनाने या मध्ये तडजोड करून मोहता
मिल पूर्वरत सुरू करावा व कामगाराचे थकीत वेतन दावे.
किंवा शासनाने मिल स्वता चालवून कामगाराचे संपूर्ण देणे आहे हे त्वरीत करावे. या मागणी साठी आम्ही अनेकदा निवेदन व वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. परंतु त्यावर कायमस्वरूपी काही तोडगा निघाला नाही. तरी यावर 8 दिससाच्या आत तोडगा नाही निघाला तर उग्रस्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा यावेळी देण्यात आला, यावेळी काही अनुचित प्रकार झाला तर याला प्रशासन स्वता: जवाबदार राहील. ताबडतोब याची दखल घ्यावी. डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट उपविभागीय अधिकारी चंन्द्रभान खंडाईत यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी मनीष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, जिवनभाऊ उरकुडे. चारू आटे, प्रणय पाटील, अविनाश नवरखेले, जितेंद्र शेजवाल, श्याम इडपवार. अरुण काळे, रत्नाकर कुभारे, विलास ढोबळे, सचिन खाडरे, नितिन कानकाटे, पोषक लाडे, सुभाष महादेव, दुर्गादास मानकर, योगेश जंगले, बबन बेलखडे, कवडू कळबे,मारोती कोहपरे, किशोर कडवे, राजेश खानकूरे, शरद मुळे, शंकर नगराळे, भारत भगत, रजितसीग ठाकुर, विनोद ठाकरे, प्रविण झाडे, हेमत शेळके, मनोहर काळे, बालाजी घुसे, विशाल थुल, नुतन राठोड सर्व कामगार उपस्थित होते.