संतापजनक! नागपुरात एकाच रात्रीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार* *नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.*

*संतापजनक! नागपुरात एकाच रात्रीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार*

*नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.*

संतापजनक! नागपुरात एकाच रात्रीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार* *नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.*
संतापजनक! नागपुरात एकाच रात्रीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार*
*नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : -सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की क्राईम कॅपिटल उपराजधानी नागपुरात महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. ही घटना गुरुवारच्या(29 जुलै) रात्री ते शुक्रवारच्या (30जुलै) पहाटे घडली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी नराधमांनी मदतीच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केला. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
पहिल्यांदा घडलेल्या बलात्काराचा घटनाक्रम -घटनेच्या दिवशी गुरुवारी(29 जुलै) पीडिता सायंकाळी नाशिकला जायचे म्हणून घरून निघाली आणि मानस चौकात पोहचली. पण नाशिकला जायला तिच्याजवळ ना पैसे होते ना कसे जायचे हे माहीत होते. यावेळी काही टवाळखोर छेड काढत असल्याचे पाहून एक ऑटोचालक तिला मदत करतो असे म्हणाला. मदतीच्या नावावर तिला मोमिनपुरा टिमकी भागात राहत असलेल्या खोलीत नेले. त्या खोलीत चौघांनी पीडिता गतिमंद असल्याचा फायदा घेतला.दुसऱ्यांदा झाला बलात्कार -त्यानंतर पहाटे तिला खोलीमधून एकाने मेयो हॉस्पिटलजवळ सोडले. यावेळी पुन्हा दोघांनी एकटी असल्याचे हेरले. पण यात सोडून देणारा आणि दोघांची ओळख असल्याचा संशय असून तपास सुरू आहे. यावेळी दोघांनी मोमीनपुरा मार्गावर असलेल्या मेट्रोच्या पुलाखाली उभा असलेल्या एका ऑटोत तिच्यावर दुसऱ्यांदा आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर शुक्रवारच्या पहाटे त्याच भागात सोडले. अशा पद्धतीने सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला.हेही वाचा – सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज मुख्यमंत्री करणार पाहणी; मदतीच्या घोषणेकडे लक्षपीडिता पोहचली रेल्वे स्टेनवरून बालगृहात -ती गतिमंद असल्याने सुरुवातीला घाबरलेली होती. तिने नाशिकला जायचे आहे आणि पैसे नाही असे मदतीला आलेल्या काहीना सांगताच, तिची परिस्थिती पाहून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनला तिला नेले. यावेळी तिला स्वतःच्या खर्चाने नाशिकचे तिकीट काढून दिले. पण यावेळी स्टेशनवर ती रडत असताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिसली. यामुळे तिला रेल्वे जीआरपीच्या मदतीने काही बोलत नसल्याने किंवा आपबीती सांगू शकत नसल्याने चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला बालगृहात नेण्यात आले.घटनेनंतर दोन दिवसाने सांगितली आपबीती -विचारपूस केली असता तिने आपबीती बालगृहाच्या अधीक्षक यांना सांगितली. यावेळी तिचा जवाब नोंदवण्यात आला. यावेळी बर्डी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची माहिती मिळताच तत्काळ वर्णनावरून माहिती घेत त्या संशयित चौघांना ताब्यात घेतले. यावेळी या चौघातील एकाने दुसऱ्यांदा घडलेल्या घटनेबद्दल सागितले असे बोलले जात आहे. पण याचा शोध वरिष्ठ पोलीस घेत आहेत.ती पीडिता यापूर्वीही घरातून गेली होती निघून -ती पीडिता यापूर्वीही घरातून निघून गेली असल्याची माहिती समोर येत आहे. वारंवार घरातून निघून जात असल्याने कुटुंबियसुद्धा तिला सोबत ठेवायला तयार नसल्याचे समोर येत आहे. यासोबतच ती शेलटर होममध्ये राहत असल्याचीसुद्धा माहिती मिळत आहे. यामुळे पीडितेकडून संपूर्ण घटनाक्रम समजावून घेत असल्याचे बोलले जात आहे.बर्डी पोलिसांनी चार संशयितांना घेतले ताब्यात -यामध्ये ऑटोचालक मो. शहानवाज उर्फ सांना वल्द मो. रशीद (वय 25, रा.ताकीया), मोहम्मद तैसीक वल्द मो. युसूफ (वय 26, मोमीनपुरा), मो. मुशीर (वय 23, बकरामंडी मोमीनपुरा) अशी तिघांचे नावे असून, इतर आरोपींचे नावं कळले नाहीत. उर्वरित दोघांचा शोध घेतला जात आहे.