मंकीपॉक्सपासून बचावासाठी आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपुर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
नवी दिल्ली,: – देशातील मंकीपॉक्सच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बुधवारी या साथीच्या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘करू’ आणि ‘करू नका’ अशा आशयाची यादी जारी केली आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात बराच काळ किंवा वारंवार
ने म्हटले आहे की, संसर्ग टाळण्यासाठी संक्रमित व्यक्तीला इतर व्यक्तींपासून दूर ठेवावे. याशिवाय, हँड सॅनिटायझरचा वापर, साबण आणि पाण्याने हात धुणे, मास्क आणि हातमोजे घालणे तसेच आजूबाजूच्या भागाचे निर्जंतुकीकरणही केले जाऊ शकते, अशा काही उपायांच्या आधारे हा आजार टाळता येऊ शकतो. त्याचप्रमाणे संक्रमित आढळलेल्या लोकांसोबत रुमाल, बेडिंग, कपडे, टॉवेल आणि इतर वस्तू शेअर करणे टाळावे. तसेच रुग्ण आणि संसर्ग नसलेल्या व्यक्तींचे घाणेरडे कपडे एकत्र न धुण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, संक्रमित आणि संशयित – रुग्णांमध्ये भेदभाव करू नका. याशिवाय कोणत्याही अफवा किंवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका.