महाड तहसील कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-एक कर्मचारी ताब्यात

महाड तहसील कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-एक कर्मचारी ताब्यात

महाड तहसील कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई-एक कर्मचारी ताब्यात

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड तहसील कार्यालयात तक्रारदार जयंत रामा मोरे रा. करंजखोल ता. महाड यांचे मौजे दाभेकर कोंड येथील जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 चे वर्ग – 1 करून घेण्याकरता तसेच 32 म चे प्रमाणपत्र देण्याकरिता तहसील कार्यालय कर्मचारी प्रमोद साहेबराव माळवे क्रमांक -1 व खाजगी इसम आरोपी क्रमांक 2 यांनी दिनांक 02/08/ 2022 रोजी तक्रारदार यांच्याकडे रुपये 30,000/- लाचेची मागणी करून तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष रु.30,000/- लाच स्वीकारताना लोकसेवक कर्मचारी यांच्या वतीने खाजगी इसम आरोपी क्रमांक 2 यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई चालू आहे यामुळे महाड तहसील कार्यालय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे यावेळी कारवाई करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी नवनाथ चौधरी पोलिस निरीक्षक,लाप्रवि रायगड
पोह/अरुण करकरे, पोह/ विनोद जाधव, पोह शरद नाईक /पोह महेश पाटील परिवेक्षक अधिकारी श्रीमती सुषमा सोनवणे पोलीस उपअधीक्षक, ला प्र वी, रायगड – अलिबाग
मार्गदर्शन अधिकारी पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
————+———-
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, रायगड दुरध्वनी 02141-222331
पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनावणे
मो.नं. 9702706333/8169345385
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे
मो.नं. 9730271560 पोलीस निरीक्षक चौधरी मो.न.9821233160 टोल फ्रि क्रं. 1064