चांडस येथील बंद घरातून एक लाख अठ्यांन्नव हजार रूपये किमतीचे दागिने चोरीमुळे उडाली खळबळ
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगांव : – मालेगाव तालुक्यातील चांडस गावात 1 ऑगस्ट रोजी रात्री चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 1 लाख 98 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादीच्या चांडस या गावी राहणारे जावई दीपक साहेबराव बयस वय 28 वर्ष हे आईच्या ऑपरेशनच्या निमित्ताने कुटुंबासह अकोल्याला गेले होते. त्यांच्या घरी कोणी नसल्यामुळे दरवाज्याला कुलूप लावलेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 1 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 2 ऑगस्ट रोजी सकाळी 6 च्या दरम्यान दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सुमारे 1 लाख 98 हजार रूपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला.
घटनेची तोंडी माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पाईकराव, राजेंद्र वानखेडे आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरू केला. डॉग स्कायड व बोटांच्या ठसे तज्ञांची ही मदत यावेळी घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
याप्रकरणी 2 ऑगस्ट रोजी रात्री गजानन आत्माराम सोळंखे वय 50 रा.चांडस तालुका मालेगांव जिल्हा वाशिम यांनी फिर्याद दिली असता शिरपूर पोलिसात गुन्हा क्रमांक 235/2022 नोंदवून भादंवि च्या 457, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जगदीश बांगर करीत आहेत.✍