अखेर माहिती अधिकार अर्जानेच केली पंचायत समिती रोहा च्या कार्भाराची पोल खोल…. रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नक्की कुणाच्या दावणीला….

अखेर माहिती अधिकार अर्जानेच केली पंचायत समिती रोहा च्या कार्भाराची पोल खोल….
रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नक्की कुणाच्या दावणीला….

अखेर माहिती अधिकार अर्जानेच केली पंचायत समिती रोहा च्या कार्भाराची पोल खोल.... रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नक्की कुणाच्या दावणीला....

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502

रोहा :तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायतीत २०२१ मधील १४व्या वित्त आयोगाच्या निधीचा आराखडा व ग्रामसभेत घेतलेला ठराव, निधीच्या खर्चाची केलेली तपासणी तसेच सभेचे अजेंठे,मासिक सेभेचे ठराव त्यावरील सह्या,विकास कामे, योजना,या सर्व कामांची दप्तर तपासणी होऊन योग्य कारवाई होणे कामी तक्रारी अर्ज दि:२०/०२/२०२० रोजी पंचायत समिती रोहा,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि.प.अलिबाग यांच्या कडे केली होती.
त्या तक्रारीला फुटबॉल खेलाचे जणू काही स्वरूप देऊन गेली दोन वर्षे पं समिती चे विस्तार अधिकारी एम्.जी.फरतडे.व ए.ए.दांडेकर टोलवा टोळवी करत असल्याचे माहिती अधिकार अधिनियम २००५अंतर्गत दिनांक ०४/०५/२०२२च्या अर्जाने मागविलेली माहिती ने उघड झाली.
मग ही केलेली तक्रार रितसर असतांना वरील विस्तार अधिकारी यांना वरीष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नक्की कोणाचा अभय होता…? किंवा कोणाच्या दावणीला बांधलेले आहेत असे एक नाही अनेक प्रश्न आता जोर धरू लागले आहेत.
वरील विषयी तक्रार केली असता पंचायत समितीचे वरीष्ठ अधिकारी यांनी एक नाही अनेक पत्रे पाठवून त्या पत्रांची बेदखल घेत त्या पत्रांवर काहीही खुलासा न देता उलट खोटे रिपोर्ट न पटणारे देऊन वेळोवेळी दिशाभूल करणारी माहिती वरीष्ठांना देण्याचे प्रयत्न माहिती अधिकार अर्जानेच अखेर उघड झाल्याचे दिसत असून अखेर पर्यंत तक्रार नुसार अहवाल नाही कार्यालयात दिले की नाही तक्रारदारास दिली असे माझे म्हणणे आहे.
आतातर स्पष्टच झाले आहे की कामे न करताच निधीचा गैरवापर झाल्याचे आरोप आहे.
आजवर पंचायत समितीच्या कारभाराचा गैर अफाहार व गैर कारभारावर माहितीचे अधिकारात अर्ज करुन मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल असे स्पष्ट केले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने सेसफंडाचे गैरअफार, अपुर्ण, राजिप शाळे ची दुरुस्ती असे वेगवेगळे विषय ऐरणीवर येणार आहेत.