पनवेल मनविसेकडून महाविद्यालयात युनिट ची स्थापना

पनवेल मनविसेकडून महाविद्यालयात युनिट ची स्थापना

पनवेल मनविसेकडून महाविद्यालयात युनिट ची स्थापना
✍संतोष आमले ✍
पनवेल तालुका प्रतिनिधी
📱9220403509📱

पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य नवीन पनवेल, कामोठे,खारघर येथील महाविद्यालयात मनविसेकडून युनिटची स्थापना करण्यात आली. मनविसे संघटक यश सरदेसाई व पनवेल महानगर शहर अध्यक्ष योगेश चिले यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. नवीन पनवेल मधील पिल्लई महाविद्यालय, कामोठे येथील महात्मा गांधी मिशन महाविद्यालय , खारघर येथील एसी पाटील महाविद्यालय येथे विद्यार्थीसेनेचे युनिट उद्घाटन करण्यात आले.
*महाविद्यालयातील वाढीव फी, रॅगिंग,लॅब मधील अस्वछता,छेडछाडीचे प्रकार, वाढीव डोनेशन, प्रवेश प्रक्रियेत अडथळा हे सर्व थांबण्यासाठी युनिट ची स्थापना करण्यात आल्याचे मनविसेचे पनवेल महानगर अध्यक्ष अनिकेत मोहिते यांनी सांगितले.*
त्याप्रसंगी योगेश चिले, प्रवीण दळवी, पराग बालड,राहुल चव्हाण,प्रणव कारखानीस, संदीप जाधव,मंदार गोसावी, प्रथमेश गवळी,सचिन जाधव, राज क्षीरसागर,आयुष घागै आदी पदाधिकारी उपस्थित होते.