धक्कादायक ! ‘महाज्योती’ने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केली, आ. सत्यजीत तांबे यांनी वेधले सरकारचे लक्ष

49

धक्कादायक ! ‘महाज्योती’ने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केली, आ. सत्यजीत तांबे यांनी वेधले सरकारचे लक्ष

मीडिया वार्ता

मुंबई- प्रतिनिधी

‘महाज्योती’ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, या संस्थेतर्फे गोरगरिब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई व नीट या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. 

महाज्योतीतर्फे देण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई व नीट या परीक्षांच्या प्रशिक्षणार्थीची संख्या गेल्या वर्षी १५ हजारांवरून ६५०० पर्यंत कमी करण्यात आली आहे, का असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील हुशार विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित

यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही संख्या ६५०० केल्याचे मान्य केले.

मंत्री सावे यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, “महाज्योती संस्थेत सन २०२२-२३ मध्ये MHT-CET/JEE / NEET या प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांचे एकूण ४९६२ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी ४२११ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होते. सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याची संख्या लक्षात घेऊन सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करुन ६५०० करण्यात आली आहे.” एमएचटी-सीईटी, जेईई व नीट या परीक्षांच्या प्रशिक्षणार्थीची संख्या गेल्या वर्षी १५ हजारांवरून ६५०० पर्यंत कमी करण्यात आली असल्याने राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.