कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील माध्यमिक विद्यालयास तेरा हजार रुपयाची देणगी

61

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील माध्यमिक विद्यालयास तेरा हजार रुपयाची देणगी

सुनील भालेराव

मो: 9370127037

कोपरगाव तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल संवत्सर येथे डॉन बॉस्को स्कूल मुंबई येथील माजी प्राचार्य तसेच संजीवनी सैनिक स्कूलचे कमांडंट सन्माननीय श्री.अशोकराव थोरात साहेब यांनी विद्यालयास 13,000 रू. किंमतीचे बॅडमिंटन,व्हॉलीबॉल,हँडबॉल इत्यादी खेळांचे साहित्य देणगी स्वरूपात दिले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय श्री.राजेश आबा परजणे होते.समवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री.चंद्रकांत मामा लोखंडे साहेब,स्थानिक सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री.मधुकरराव साबळे, सल्लागार समिती सदस्य श्री सचिन भाऊ काळे,माजी केंद्रप्रमुख श्री.दिलीपराव ढेपले साहेब,ग्रामपंचायत सदस्य श्री महेश भाऊ परजणे,श्री.गणेश साबळे,विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री.मोरे आर.एस.सर, पर्यवेक्षक श्री. जेजुरकर व्ही.के. क्रीडा प्रमुख श्री.मोरे व्ही.बी.सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.श्री.मधुकरराव साबळे, श्री.राजेश आबा परजणे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापरापेक्षा खेळात जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन केले.थोर देणगीदार श्री. थोरात साहेब यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील शिस्तीचे महत्व,पालक व शिक्षकांच्या आज्ञांचे पालन करावे,व्यायाम, संतुलित आहार, आरोग्याची काळजी, जीवनामधील खेळाचे महत्व,व्यक्तिमत्व विकासाच्या संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत विद्यालयात गोलपोस्टसह नव्याने तयार करण्यात आलेल्या हँडबॉल मैदानाचे पूजन करून इयत्ता दहावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचा प्रेक्षणीय सामना खेळवण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.खेताडे जे.व्ही.सर तर आभार श्री.शिंदे बी. एम. सर यांनी मानले.