*सात बारा घरपोच मिळणार!*
*आता त्रास व शुल्क वाचणार*
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आभार मानले*

*आता त्रास व शुल्क वाचणार*
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून आभार मानले*
*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335//
*अहेरी:-* येत्या 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिना पासून आता सात बारा उताऱ्याची पहिली प्रत घरपोच मिळणार असून महाराष्ट्र शासनाच्या या क्रांतिकारक व ऐतिहासिक निर्णयाचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वागत करून राज्याचे महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, याआधी नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिले असून खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच सातबाराचे उतारा देणारे देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे म्हटले आहे.
घरपोच सेवेमुळे आता नागरिकांना सात बारा साठी त्रास, हेलपाटे व शुल्क वाचणार आहे. हा निर्णय तर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे असून शासनाच्या नावीन्यपूर्ण योजना व लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्याची नितांत गरज नव्हे अनिवार्य असून आता थेट सातबाराची घरपोच सेवा मिळणार असल्याने या लोकाभिमुख निर्णयाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वागत करून नागरिकांना अधिक सुलभ व जलद गतीने याचा लाभ मिळणार असल्याने आनंद व्यक्त केले आहे.