अन्यायग्रस्त महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी* *गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन*

50

*अन्यायग्रस्त महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी*
*गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन*

अन्यायग्रस्त महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी* *गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन*
अन्यायग्रस्त महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी*
*गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

सातारा : – सातारा जिल्हयात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या प्रक्रियेला सव्वा दोन महिने झाले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. जिल्ह्यातील कुठल्याही महिलेवर अन्याय, अत्याचार झाल्यास त्यांनी तो सहन न करता नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करावी. तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा आढावा आज गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, अन्य विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाल्यापासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले आहे. नुकताच शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली आहे. बाजारपेठा, मॉल्स नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या ठिकाणी आता गर्दी दिसत आहेत. या सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही महिला व मुलींची छेडछाड होणार नाही यासाठी बीट मार्शल यांचे पेट्रोलिंग वाढवण्यात यावे. साध्या ड्रेसमध्ये पोलीस तैनात करावेत. कोणीही संशयित आढळल्यास त्याला ताब्यात घेऊन चौकशी करावी. त्याचे वर्तन योग्य नसल्याचे आढळ्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई करा, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.