बलात्कार पीडितेला कोर्टाची गर्भपाताची परवानगी; आईचीच होती आरोपीला साथ*

43

*बलात्कार पीडितेला कोर्टाची गर्भपाताची परवानगी; आईचीच होती आरोपीला साथ*

बलात्कार पीडितेला कोर्टाची गर्भपाताची परवानगी; आईचीच होती आरोपीला साथ*
बलात्कार पीडितेला कोर्टाची गर्भपाताची परवानगी; आईचीच होती आरोपीला साथ*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : अत्याचार पीडितेच्या गर्भपातास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने परवानगी दिली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर पीडिता गर्भवती झाली. या पीडितेचा १८ आठवड्याचा गर्भपात करण्यासंदर्भात मेयोच्या वैद्यकीय मंडळाने सादर केलेल्या अहवाल लक्षात घेत या मुलीचा गर्भपात केला जाऊ शकतो, त्यामुळे तो वैद्यकीय देखरेखीत करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
या प्रकरणाच्या खटल्यासाठी आवश्यक असलेल्या डीएनए चाचणीसाठीही गर्भाचे नमुने घेण्यात यावेत, असे आदेश न्या. विनय देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांनी दिले.
पीडित मुलीच्या आईच्या मित्राने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तसंच आईच्या नातेवाईकानेही तिच्यावर अत्याचार केला. या सर्व प्रकाराला तिच्या आईचंही समर्थन होतं. दरम्यान पीडितेने मोठ्या हिंमतीने २६ जून २०२१ ला खापरखेडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अनिलकुमार श्रीवास्तव, संभूनाथ पाल आणि आईविरुद्ध गुन्हा दाखल केला.

करून गर्भपाताची परवानगी मागितली. यावर न्यायालयाने मेयोच्या वैद्यकीय मंडळाला गर्भपातासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चार डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाने काही दिवसांपूर्वी अहवाल सादर केला. पण, हा अहवाल वैद्यकीय भाषेत होता. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाकरिता व आदेश देण्याकरता स्पष्ट इंग्रजी भाषेत अहवाल हवा असून तो अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला दिले होते. त्यानुसार मंडळाने अहवाल केला. सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या अहवालाचा आधार घेत न्यायालयाने या गर्भपाताला परवानगी दिली. पीडित मुलीतर्फे अॅड. आदिल मिर्झा आणि राज्य सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.