*भेसळीच्या संशयावरुन मिरची पावडर जप्त*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अकोला :- अन्न व औषध प्रशासन विभागाव्दारे मे. आशिर्वाद ट्रेडर्स, हिवरखेड रोड अकोट येथे मिरची पावडरमध्ये भेसळ होत असल्याचे माहिती मिळाली. याआधारावर मे. आशिर्वाद ट्रेडर्सवर अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी धाड टाकून मिरची पावडरचा नमुना विश्र्लेषणासाठी घेतला असून उर्वरित 58 किलो मिरची पावडर किंमत 9 हजार 280 रुपयांचा साठा जप्त केला आहे. मिरची पावडर विश्र्लेषणाकरिता पाठविली असून विश्र्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर विक्रेत्यावर कार्यवाही करण्यात येईल. ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार व स्टाफ नमुना सहायक भिमराव नरवणे यांच्या उपस्थितीत झाली.