*जालना शहरात चिकन गुणिया पाठोपाठ डेंग्यूनेही थैमान.*
जालना नगर परिषद प्रशासनाला एम.आय.एम शहर उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांनी दिले निवेदन.

जालना नगर परिषद प्रशासनाला एम.आय.एम शहर उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांनी दिले निवेदन.
*✒सतिश म्हस्के✒*
जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010
जालना:- जालना शहरात चिकन गुणिया पाठोपाठ डेंग्यूनेही मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामूळे शहरातील जनता भयाखाली जगत आहे आणि नगर पालिका प्रशासन कुंभकर्णीय झोपेत आहे.
जालना जिल्हात कोरोना वायरसने मोठा हाहाकार माजवला होता. आता कोरोना वायरसचा प्रादुर्भाव कमी झाला तरी, डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामूळे जालना नगर पालिका प्रशासनाला एम.आय.एम पक्षाचे शहर उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांनी डेंग्यूचा वाढत्या रुग्णाबदल उपयोजना करण्याबाबत दि. 9 ऑगस्ट ला निवेदन दिले होते.
एक महिना लोटून तरी, जालना नगर पालिका प्रशासनाने याबाबत कुठलीही उपायोजना केली नाही. आणि जनतेच्या जीवा बरोबर खेळ खेळत असल्याचे यावरुन सिद्ध होते. त्यामूळे जालना शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात भया खाली जिवन जगण्यास आज मजबुर होत आहे. आणि नगर पालिका प्रशासन कुंभकर्णाची भुमीका बजावत आहे.
जालना शहरात चिकन गुणिया पाठोपाठ डेंग्यूनेही शहरात थैमान घातला असून याला सर्वस्व जालना नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे, अशा प्रशासनाला शहरातून हद्दपार करा. अशा लोकांना शासन करण्याचा कोणताही अधिकार नाही. कोटिने येणारा निधी जातो तरी कुठे, डेंग्यू मलेरिया झालेल्या रुग्णांना नगर परिषद प्रशासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी एम.आय.एम ने दिलेल्या निवेदनात केली आहे.