महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी च्या ट्रॅक्टर वाहतूकीचा त्रास थांबवा. मनसे चे पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन!

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
आज दिनांक 03/09/2021 ला एम.आय.डि.सी, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाठक तसेच एम.आय.डि.सी, पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांना महिंद्रा कंपनी मधून येणारे ट्रॅक्टर चे ट्रेलर मुळे कंपनी पासून ते वडधामना रोड वरील ट्रॅक्टर गोडाउन पर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते या मार्गावर इतर छोट्या मोठ्या वाहनधारकांना तसेच पादचारी यांना जीवावर उदार होऊन मार्गक्रमण करावे लागते तेंव्हा हि गंभीर बाब असुन जीवीत हाणी सुध्दा होवू शकतो तेव्हा हे ताबडतोब थांबवावेत अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना दिले.यामार्गावर काळमेघ डेंटल कॉलेज आहे त्या विध्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, तसेचट्रॅक्टर गोडाउन समोर खूप मोठा जाम लागला असतो, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना जीव मुठीत ठेऊन गाडी काढावी लागते कुणाचीही जीवित हानी होऊ नये याकरिता ती वाहतूक कोंडी चार दिवसात सोडवावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल या वेळी हिंगणा तालुका अध्यक्ष दीपक नासरे, माजी तालुका अध्यक्ष सचिन चिटकुले, गुड्डू पारधी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले ,या वेळी नंदू पोटे, शुभम भोकरे,चेतन आवारे, महादेव राणे, प्रशांत वाघ, समीर कांबळे, सागर भेंडे, वैभव मुळे, निलेश भुरसे, अश्विन पुंडे, अंकित आवारे, अतुल वरखेडे उपस्थित होते.