जालना रात्रीपर्यंत बदली न झाल्यास पोलीस हवालदाराचा आत्मदहनाचा इशारा, हवालदार गायब.*

49

*जालना रात्रीपर्यंत बदली न झाल्यास पोलीस हवालदाराचा आत्मदहनाचा इशारा, हवालदार गायब.*

जालना रात्रीपर्यंत बदली न झाल्यास पोलीस हवालदाराचा आत्मदहनाचा इशारा, हवालदार गायब.*
जालना रात्रीपर्यंत बदली न झाल्यास पोलीस हवालदाराचा आत्मदहनाचा इशारा, हवालदार गायब.*

*✒सतिश म्हस्के✒*
जालना जिल्हा प्रतिनिधी
9765229010

जालना:- जालना जिल्हातील पोलीस विभागातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जालना येथील पोलीस दलात कार्यारत असलेल्या एका पोलीस हवालदाराने स्वता:च्या बदली संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकला होता. त्या व्हिडीओत तो स्वत: बोलताना दिसत होता. या व्हिडीओत हवालदाराने बदली न झाल्यास पोलीस अधीक्षकांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आपली संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहन करु, असं पोलीस हवालदार म्हणाला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण तरीही त्याच्या या व्हिडीओची दखल घेण्यात आली नाही. त्याची खरंच संध्याकाळपर्यंत बदली न झाल्याने संबंधित पोलीस हवालदार बेपत्ता झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

काय आहे हे प्रकरण??

जालना जिल्हातील पोलीस प्रशासनामध्ये नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन विनंती करत बदलीचा अर्ज केला होता. मात्र आत्तापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी आज एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ पाठवला. त्यामध्ये “माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन”, असा इशारा त्यांनी दिला होता.

पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी काय म्हणाले होते?

“पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो. त्यांनी आमच्या बदलीचं करतो म्हणून सांगितलं. पण आमची बदली केली नाही. आम्ही आत्मदहन करत आहोत. आम्हाला फक्त आश्वासन दिलं. त्यानंतर दोन-तीन हदलीच्या याद्या निघाल्या. पण आमचं नाव नाही. आमची संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही तर आम्ही आत्मदहन करत आहोत”, असं पोलीस हवालदार गोविंद कुलकर्णी व्हिडीओत बोलताना दिसले.