वंचितांच्या वस्तीत हास्य फुलले

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
हिंगणा : -समाजीक कार्यकर्ते अनिल चानपुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नागलवाडी च्या इंदिरा नगर या मांगगारोडी वस्तीत शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना शिक्षणासाठी प्रोसाहित करण्यासाठी शिक्षण साहित्य यांचे वितरण करण्यात आले.लल्लूसाई चाॅरिटेबल ट्रस्टचे कोशाध्यक्ष अनिल चानपुरकर यांचा वाढदिवस हा मोठा वाजागाज न करता साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.तालुक्यातील नागलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या इंदिरा नगर या शिक्षणाचा गंध नसलेल्या वस्तीमध्ये बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच काही महिलांना शिलाई मशीन सुध्दा देण्यात आली.अनिल चानपुरकर हे तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात प्रमुख असं नाव आहे,कोरोणा काळात त्यांनी परराज्यात जाणाऱ्या गरजुंसह मोठ्या प्रमाणात मदत केली,हिच बांधीलकी जोपासत त्यांनी आज आपला वाढदिवसाच्या मांगगारोडी समाजाची वस्ती असलेल्या नागलवाडीतील इंदिरा नगर येथील बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत साजरा केला या वेळी सरपंच नाना लापकाले, जेष्ठ पत्रकार भाई सिरसाट, किशोर बिडवाईक, इस्त्राईल महाजन, घनश्याम गायकवाड, गजानन ढाकुलकर, दिपक रणदिवे,विक्की कैकाडे,विरश्री चानपुरकर, विशाल बांदरे व नागलवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,मांगगारोडी वस्ती हे शिक्षणापासून वंचित असलेले गाव येथे शिक्षणाची आवाड निर्माण व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल चानपुरकर यांनी या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.