सालाबादप्रमाणे यंदाही रोहा तालुका धान्य गोदामाची अवस्था बिकट.ग्राहकांचे आरोग्य धोक्यात?

सालाबादप्रमाणे यंदाही रोहा तालुका धान्य गोदामाची अवस्था बिकट.ग्राहकांचे आरोग्य धोक्यात?

सालाबादप्रमाणे यंदाही रोहा तालुका धान्य गोदामाची अवस्था बिकट.ग्राहकांचे आरोग्य धोक्यात?

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ (कोकण)
📞8080092301📞

रोहा – रोहा तालुका धान्य गोदामाची पावसाळी हंगामातील अवस्था सालाबादप्रमाणे यंदाही आहे तशीच आहे.धान्य वितरण करण्यात येते त्याच ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली असून सांडलेले, कुजलेले धान्य खाण्यासाठी डुकरांचा वावरही असल्याने धान्याला दुर्गंधी येते असते आणि असे धान्य ग्राहकांपर्यंत वितरीत होत असते.हे चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे.लक्षवेधी फोटो प्रसिद्ध झाले कि थातुरमातुर डागडुजी केली जाते.ग्रामिण भागातील लोकांना आपणांस मिळालेले धान्य कोणत्या अवस्थेतून आले आहे हे माहित नसते.खर तर शासन प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून प्रचार करते . मात्र ते नियम स्वतः पाळतांना दिसून येत नाही.कारण या हलगर्जीपणाला अजूनतरी जाब विचारला गेलेला नाही.कारण या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसावा असे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
रोहा तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here